Video : ‘पानीपत’चे ‘सपना है सच है’ रोमँटिक गाणं प्रदर्शित

या चित्रपटातील 'मर्द मराठा' हे पहिलं गाणं प्रदर्शित केल्यानंतर आता निर्मात्यांनी चित्रपटातील 'सपना है सच है' दुसरं गाणं आज प्रदर्शित

Mumbai

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा ‘पानीपत’ हा चित्रपट ६ डिसेंबर रोजी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. चित्रपटातील सर्वच व्यक्तिरेखांच्या लूकचे पोस्टर आणि ट्रेलर प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटातील ‘मर्द मराठा’ हे पहिलं गाणं प्रदर्शित केल्यानंतर आता निर्मात्यांनी चित्रपटातील ‘सपना है सच है’ दुसरं गाणं आज प्रदर्शित केले आहे.

‘सपना है सच है’ हे गाणं अभिनेता अर्जून कपूर आणि अभिनेत्री कृती सेनन यांच्यावर चित्रीकरण करण्यात आले आहे. या गाण्यात सदाशिवर राव आणि पार्वतीबाई यांच्या लग्नाचे चित्रीकरण दाखवण्यात आले आहे. पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीच्या या लग्नात सदाशिव राव आणि पार्वतीबाई यांच्या प्रेमकथेचे सुंदर चित्रण केले गेले आहे. क्रितीने पार्वतीबाईंची भूमिका साकारली असून, भरजरी साडी, जड दागिने कपाळी चंद्रकोरमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहेत. तर अर्जुन कपूरही सदाशिवराव भाऊ यांच्या भूमिकेत योग्य बसला आहे.

‘सपना है सच’ हे गाणं जावेद अख्तर यांनी लिहिले असून अभय जोधपूरकर आणि श्रेया घोषाल यांनी गायले आहे. तर अजय-अतुल यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. हा चित्रपट पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित असून सन १७६१ मध्ये झालेलं हे युद्ध भारताच्या इतिहासातील सर्वांत महत्त्वाचं युद्ध मानले जाते.

येत्या ६ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून कृती आणि अर्जुन व्यतिरिक्त या चित्रपटात संजय दत्त, पद्मिनी कोल्हापुरे, मोहनीश बहल, कुणाल कपूर आणि झीनत अमान यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.