घरट्रेंडिंग'पानिपत'मध्ये अर्जुन कपूरला पाहून नेटकऱ्यांनी लावला डोक्याला हात!

‘पानिपत’मध्ये अर्जुन कपूरला पाहून नेटकऱ्यांनी लावला डोक्याला हात!

Subscribe

नेटकरी सध्या पानिपत या चित्रपटाची तुलना पद्मावत आणि बाजीराव मस्तानी यासोबत करत आहे. तसंच जर या चित्रपट मनोरंजन नसेल तर पैसे परत मागू नका, असं नेटकरी म्हणतं आहे.

मंगळवारी सत्य घटनेवर आधारित असलेल्या ‘पानिपत: द ग्रेट बेट्रेयल’ या सर्वाधिक चर्चित असलेला चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता संजय दत्त, अर्जुन कपूर, मोहनीश बहल आणि क्रिती सेनॉन हे प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर ट्रेंडवर तो पहिल्या क्रमांवर आला होता. काही नेटकरी ‘पानिपत’ या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल कौतुक करत आहेत. तर काही नेटकरी ट्रेलरची थट्टा करत आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर ‘पानिपत’ चित्रपटाबद्दल मीम्स तुफान पाऊस पडत आहे.

काही नेटकऱ्यांनी ‘पानिपत’ या चित्रपटाची तुलना ‘पद्मावत’ आणि ‘बाजीराव मस्तानी’सोबत केली आहे. पानिपतचा ट्रेलर ‘पद्मावत’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटासारखा असल्याचे बोलले जात आहे. एका युझरने असं लिहिलं की, ‘जर चित्रपटामध्ये मनोरंजन नसेल तर पैसे परत मागू नका. आपल्या पोस्टरमधून स्पष्टपणे चेतावणी दिली आहे.’ तसंच ‘पानिपत’ मधील अभिनेता संजय दत्त याची तुलना ‘पद्मावत’मधील खिलाजी म्हणजेच रणवीर सिंग सोबत केली आहे.

- Advertisement -

हे मीम्स पाहून तुम्हाला देखील

- Advertisement -

 

‘पानिपत’ हा चित्रपट ६ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता हा चित्रपट ‘पद्मावत’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाचा रेकोर्ड ब्रेक करेल का? हे बघण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.


हेही वाचा – #PanipatTrailer: ‘पानिपत’च्या महायुद्धाचा थरार रुपेरी पडद्यावर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -