घरमनोरंजनदुसऱ्या चित्रपटात 'मोदी' मीच - परेश रावल

दुसऱ्या चित्रपटात ‘मोदी’ मीच – परेश रावल

Subscribe

'पंतप्रधान मोदींच्या जीवनावर आणखी एक चित्रपट बनणार असून त्यामध्ये मी स्वत: त्यांची भूमिका साकारणार आहे', असंही परेश रावल यांनी स्पष्ट केलं आहे. 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित  ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट (बायोपिक) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय मोदींची भूमिका साकारत असून, चित्रपटाचं पहिलं पोस्टरही रिलीज झालं आहे. आगामी लोकसभा निवडणूंकापूर्वी ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपट प्रदर्शित होईल अशी सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे. एकीकडे निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मोदींवर येणारा हा चित्रपट, चित्रपटाच्या पोस्टरवरील विवेक ओबेरॉयचा ‘मोदी लूक’ अशा अनेक मुद्द्यांवरुन खल होत असताना, दुसरीकडे अभिनेता परेश रावल यांनी याचसंदर्भात एक सनसनी वक्तव्यं केलं आहे. चित्रपटामध्ये मोदींची भूमिका जरी विवेक ओबेरॉय साकारत असला तरी, ”मोदींची भूमिका माझ्याशिवाय दुसरं कोणीच चांगल्या पद्धतीने साकारू शकत नाही”… असा दावा परेश रावल यांनी केला आहे. याशिवाय ‘पंतप्रधान मोदींच्या जीवनावर आणखी एक चित्रपट बनणार असून त्यामध्ये मी स्वत: त्यांची भूमिका साकारणार आहे’, असंही परेश रावल यांनी स्पष्ट केलं आहे.

मोदींवर दुसरा चित्रपट येणार ?

परेश रावल यांनी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी यांच्यावर चित्रपट करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, त्यावेळी या चित्रपटाचं नाव काय असणार? त्याचं दिग्दर्शन कोण करणार? याविषयीच चर्चा सुरु होती. मात्र, अखेर याविषयीचा उलगडा झाला असून, रावल निर्मीती करत असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन उमंग कुमार करणार आहेत. मोदींचा जीवनप्रवास इतका मोठा आहे, त्यामध्ये इतके पैलू आहेत की मोदींच्या जीवनावर आणखी एक चित्रपट नक्कीच तयार होऊ शकतो, असंही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, विवेक ओबेरॉयची भूमिका असलेला ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल. या चित्रपटातून राजयोगी व्यक्तिमत्वाच्या आणि वैश्विक नेत्याचे जीवन जगासमोर येणार आहे, अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

#pareshrawal #bollywood #politician #indian #india

A post shared by Paresh Rawal (@pareshrawal_official) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -