घरमनोरंजनपरिणीती देणार जीजूला 'हे' गीफ्ट

परिणीती देणार जीजूला ‘हे’ गीफ्ट

Subscribe

बहिण प्रियांका चोप्राच्या लग्नासाठी परिणितीने एक विशेष प्लॅन केला आहे. लवकरच निक आणि प्रियांकाचे लग्न होणार आहे. या लग्नासाठी परिणिती खुप उत्सुक आहे. नुकतेच दिलेल्या मुलाखातीत परिणितीने ही माहिती दिली.

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या बहिण प्रियांका आणि निक जोन्सच्या लग्नाबाबत खुप उत्सुक आहे. सध्या अभिनेत्री प्रियांका आणि निक जोन्स यांच्या लग्नाची तयारी सुरु आहे. दरम्यान, परिणीती आपल्या होणाऱ्या जीजूचे बुट लपवण्याचा प्लॅन करते आहे. बुट लपवून निक जवळून चांगल्याच रकमेची वसूली करण्याच्या तयारीत परिणीती आहे. नुकत्याच झालेल्या फिल्म फेअर पुरस्कारादरम्यान, दिलेल्या मुलाखातीत परिणीतीने ही माहिती दिली. बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका आणि निक जोन्स लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. हा सध्या लोकांचा चर्चेचा विषय आहे. नेहमीच या दोघांचे फोटो सोशल मीडियावर झळकत असतात. परिणीती ही निकची आवडती मेहूणी असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये सुरु आहे.

कार्यक्रमादरम्यान, परिणीतीला याची विचारणा केली असता ती म्हणाली,”का नाही? मला निककडून किती पैसे वसूल करायचे आहेत यावर मी विचार करते आहे. मी सर्वात जवळची मेहूणी असल्याचे निक याने स्वतःहून सांगितले.” निकने प्रियांकाला कशा प्रकारे प्रपोज केलं, ही बातमी कशी मिळाली याबद्दलही माहिती तिने सांगितली. “प्रियांकाला प्रपोज करण्यात आल ही माहिती सर्वात आधी मला मिळाली. मला त्या पूर्वीही याची कल्पना होती. प्रियांकाच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला प्रपोज करण्यात आल. मला रात्री ३ वाजता प्रियांकाचा मिस कॉल आला होता. ती सुट्टीवर असल्याची मला कल्पना होती. त्यामुळे मी तिला व्हिडिओ कॉल केला. व्हिडिओ कॉलवर प्रियांकाने मला अंगठी दाखवली. प्रियांकाबरोबर निक ही होते, हे बघून मला आनंद झाला. हा खूप भावूक प्रसंग होता. प्रियांकाच्या आईची परवानगी घेण्यासाठी निक जीजू भारतात आले होते. ते खरचं खूप चांगले आहेत. आम्ही गोवा येथे ट्रीपसाठी गेलो होतो. त्यावेळीही निकने प्रियांकाची खूप काळजी घेतली.”

- Advertisement -

परिणीती चोप्रा सोशल मीडियाद्वारे या जोडप्याचे फोटो शेअर करते. फिल्मफेअर कव्हरसाठी परिणीतीने नुकतेच एक फोटोशूट केले. या फोटोमध्ये परिणीती बिकिनीमध्ये दिसत आहे. या फोटोशूटचे फोटो परिणीतीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर टाकले आहेत. या फोटोंना तिचे फॅन्स खूप पसंत करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -