सायनाच्या बायोपिकमध्ये श्रद्धा कपूर ऐवजी दिसणार ‘ही’ अभिनेत्री

या चित्रपटात सायनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री श्रद्धा कपूरने हा चित्रपट सोडला असून या बायोपिकमध्ये श्रद्धा कपूरऐवजी दुसरी अभिनेत्री सायनाची भूमिका साकारणार आहे

Mumbai
सायनाच्या बायोपिकमध्ये श्रद्धा कपूर ऐवजी दिसणार 'ही' अभिनेत्री

सायना नेहवाल बायोपिक मागील दोन वर्षापासून चर्चेत आहे. हा चित्रपटाचे शूटिंग पुर्ण होण्यास अनेक अडचणी येत राहिल्या. बायोपिक संदर्भात असे समजते की, या चित्रपटात सायनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री श्रद्धा कपूरने हा चित्रपट सोडला असून या बायोपिकमध्ये श्रद्धा कपूरऐवजी दुसरी अभिनेत्री सायनाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूरच्या जागी परिणीती चोप्रा ही अभिनेत्री सायनाची भूमिका करणार आहे.

स्वत:हून बायोपिकमधून माघार

या चित्रपटासाठी श्रद्धाने बॅडमिंटनचे प्रशिक्षणदेखील सुरू केले होते. काही महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर श्रद्धाने शूटिंगला सुरुवात केली होती. शूटिंग दरम्यान तिला डेंग्यू झाला. त्यानंतर आपल्या व्यग्र वेळापत्रकामुळे आणि इतर दुसऱ्या चित्रपटासाठी तिने काही वेळ दिला आहे. श्रद्धा ‘छिछोरे’ आणि ‘स्ट्रीट डान्सर’या दोन चित्रपटांमध्ये सध्या श्रद्धा व्यस्त असल्यामुळे तिने स्वत:हून या बायोपिकमधून माघार घेतली आहे. तसेच, प्रभाससोबतचचा ‘साहो’ या चित्रपटसुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

परिणीतीला स्क्रिप्ट आवडली

सर्व प्रकारचे प्रयत्न करून देखील शूटिंगच्या तारखांची जुळवाजुळव होत नसल्याने श्रद्धा कपूरच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीचा विचार करण्यात आला होता. यावेळी परिणीती चोप्राला चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली असल्याने आता या बायोपिकमध्ये श्रद्धा ऐवजी परिणीती सायनाची भूमिका साकारणार आहे. लवकरच या बायोपिक शूटिंगला सुरुवात होणार आहे.

२०१९ वर्षात येणार बायोपिक

या सोबतच, २०१९ या वर्षात अनेक बायोपिक येणार आहेत. कारगीलमधील शहीद जवानांपासून ते अॅस्ट्रोनट सोबत काही खेळाडूंवर या वर्षात बायोपिक तयार होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here