घरमनोरंजन'ति'च्या बायोपिकसाठी परिणीती गाळतेय घाम

‘ति’च्या बायोपिकसाठी परिणीती गाळतेय घाम

Subscribe

भारताची फुलराणी बॅडमिंटमपटू सायना नेहवालच्या बायोपिकसाठी अभिनेत्री परिणीती चोप्रा खूप मेहनत घेत आहे.

भारताची फुलराणी बॅटमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकसाठी परिणीती खूप घाम गाळत आहे. बॅडमिंटनचे सर्व डावपेच समजून घेण्यासाठी परिणीती चक्क बॅडमिंटन कोर्टात उतरली आहे. याबाबतची माहिती खुद्द परिणीताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून दिली आहे.

परिणीताने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या चित्रांमध्ये बॅडमिंटन खेळातील सर्व डावपेच शिकण्यासाठी परिणीता खूप कष्ट करत असल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या चित्रात बॅडमिंटनचा सराव करून दमलेली परिणीता बॅडमिंटन कोर्टमध्ये सरळ झोपी गेल्याचे दिसून येते. पोस्टमध्ये अभिनेत्री परिणीताने ऑक्टोबरमध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होईल, असे सुद्धा म्हटले आहे.

- Advertisement -

बॅडमिंटनचा सराव करून दमलेली परिणीता लिहिते की, ‘सरावा दरम्यान ऊर्जेची पातळी कायम राखण्यासाठी सायनाला कसे जमते हे जाणून आश्चर्य होते. पूर्वी…. आणि आता! सायना नेहवाल, तू हे कसे करते!’

- Advertisement -

श्रद्धा करणार होती सायनाची भूमिका पण…

दिग्दर्शक अमोल गुप्ते दिग्दर्शित या चित्रपटात पहिल्यांदा अभिनेत्री श्रद्धा कपूर सायनाची भूमिका करणा होती. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात सुद्धा करण्यात आली होती. मात्र डेंग्यू आजारातून सावरल्यानंतर चित्रीकरणाच्या तारखा जमत नसल्याने श्रद्धाला चित्रपट सोडावा लागला. २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -