घरमनोरंजनयारी, दोस्तीचा ‘पार्टी’ चित्रपट टीझर लाँच

यारी, दोस्तीचा ‘पार्टी’ चित्रपट टीझर लाँच

Subscribe

सचिन दिग्दर्शित ‘पार्टी’ सिनेमाचे टीझर नुकतेच प्रदर्शित झाले असून यामध्ये चार मित्रांची मजामस्ती प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

मैत्री, दोस्ती, फ्रेंडशीप यांची गोष्ट आपण अनेकदा मोठ्या आणि छोट्या पडद्यावर पाहिली आहे. असाच एक धमाल दोस्तीचा अनुभव प्रेक्षकांना ‘पार्टी’ या आगामी मराठी चित्रपटातून मिळणार आहे. सचिन दिग्दर्शित ‘पार्टी’ सिनेमाचे टीझर नुकतेच प्रदर्शित झाले असून यामध्ये चार मित्रांची मजामस्ती प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सुख दुःखांमध्ये नि:स्वार्थपणे सोबत करणारा हा यार आणि त्याच्या दुनियादारीची मज्जा काही निराळीच असतेच. हीच मज्जा मैत्रीचा हँगओव्हर चढवणार्‍या ‘पार्टी’ या चित्रपटाच्या टीझरमधून पाहायला मिळत आहे. या चित्रपटात ‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेक अभिनेता सुव्रत जोशी, अक्षय टांकसाळे, स्तवन शिंदे आणि रोहित हळदीकर या चौघांची मैत्री दाखवण्यात आली आहे. सोबतच प्राजक्ता माळी आणि मंजिरी पुपाला या अभिनेत्रीदेखील सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मित्रांच्या रंजक गोष्टी आणि गमतीशीर किस्से या टीझरमधून पाहायला मिळत असून एकंदर हा सिनेमा धम्माल विनोदी असल्याचे दिसून येत आहे. चित्रपटात यांच्या व्यक्तिरेखेची नावं ओमी, चकर्‍या, सुमित, मनोज, अर्पिता आणि दीपाली ही असून त्यांची ‘कहाणी’ पार्टी चित्रपटातून पुढील महिन्यात म्हणजेच २४ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.


bogada film
बोगदा फिल्मचा फर्स्ट लूक

मृण्मयी देशपांडेच्या ‘बोगदा’ सिनेमाचा फर्स्ट लूक

ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी आणि अष्टपैलू कलाकार मृण्मयी देशपांडे यांच्या अभिनयाने नटलेला ‘बोगदा’ या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच सोशल मीडियातून प्रदर्शित झाला असून दोघींच्या व्यक्तिरेखा त्यांच्या वेशभूषेतून आणि चेहर्‍यावरील भावातून भेदक, गूढ संशयास्पद असल्याच्या दिसून येत आहेत. आजवर अनेक आव्हानात्मक भूमिका साकारणार्‍या मृण्मयी देशपांडे हिने ‘बोगदा दि टनेल’ मध्ये पुन्हा एकदा वेगळी भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला आहे. सोबत रोहित कोकटे या कलाकाराची साथ त्यांना मिळणार आहे. निशिता केनी यांच्या ‘बोगदा’ चित्रपटाची निर्मिती सुरेश पनमंद आणि नंदा पनमंद सोबत करण कोंडे यांनी केले आहे. हा चित्रपट येत्या ७ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -