घरमनोरंजनVideo: 'पति पत्नी और वो' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज; नेटकऱ्यांनी केले ट्रोल

Video: ‘पति पत्नी और वो’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज; नेटकऱ्यांनी केले ट्रोल

Subscribe

१९७८ साली 'पति पत्नी और वो' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता त्याचाच रिमेक ६ डिसेंबरला होणार प्रदर्शित

बॉलिवूडच्या कलाकार कार्तिक आर्यन, भूमि पेडनेकर आणि अनन्या पांडे यांचा बहुप्रतिक्षेत असणारा ‘पति पत्नी और वो’ या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने चाहत्यांच्या मनात चित्रपटाबद्दलची असणारी उत्सुकता वाढवली आहे. या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन ‘चिंटू त्यागी’ ही भूमिका साकारत असून अनन्या पांडे ‘तपस्या’ आणि भूमी पेडनेकर ‘वेदिका त्रिपाठी’ या भूमिकेत प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

- Advertisement -

‘पति पत्नी और वो’ या चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांना आवडला असून या ट्रेलरला ४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा चित्रपट रोमँटिक-कॉमेडी ड्रामावर आधारलेला आहे. १९७८ साली ‘पति पत्नी और वो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता त्याचाच रिमेक ६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील व्यक्तिरेखांसारखेच यातील गाणे धम्माकेदार आहेत. हा चित्रपट अजीज यांच्या दिग्दर्शनाखाली तयार करण्यात आला आहे. तर या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार आणि रेनू रवि चोपड़ा हे आहेत. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता संपणार आहे.

नेटकऱ्यांनी केले ट्रेलरला ट्रोल

कन्सेप्ट आणि स्टोरीलाइन शिवाय चित्रपटात गोविंदाचे अंखियों से गोली मारे हे गाणं आणि टोनी कक्कड़ हिचे धीमे धीमे हे गाणं पुन्हा घेतल्याने नेटकरी चांगलेच भडकले आहे. यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या असून त्यातून राग व्यक्त केला आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -