ड्रग्जचा आरोप असलेली सारा गोव्यात, फोटो व्हायरल!

sara ali khan
सारा अली खान

अमली पदार्थ्यांच्या खरेदी प्रकरणी अटकेत असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्तीने एनसीबीकडे बॉलिवूड इंडस्ट्रीतील तीन मोठ्या नावांचा खुलासा केला आहे. रियाने अभिनेत्री सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा या नावांचा खुलासा केल्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. एनसीबीच्या चौकशीदरम्यान रियाने २५ बड्या कलाकारांची नावं सांगितली असल्याचं म्हटलं जातंय. पण ड्रग्ज घेतल्याचा आरोप असणारी सारा अली खान सध्या गोव्यात धम्माल करतेय.

सारा, इब्राहिम आणि त्यांचे मित्र गोव्यात मजा करत आहेत. त्यांचे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत. या व्हायरल फोटोवरून सारा गोव्यात मित्रांबरोबर एन्जॉय करतेय यावरून तीला तीच्यावर झालेल्या आरोपांबदद्ल पुटसशी कल्पना नाहीये असच दिसतय. हे फोटो आता सोशल मीडियावर आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

Back to Blue 🌊💙🧿 📸: @orry1

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

हे फोटो साराच्या फॅन पेजने शेअर केले आहेत. यात सारा, इब्राहिम आणि त्यांचे मित्र गोवा बीचवर मस्ती करताना दिसत आहेत. मात्र हे फोटो आत्ताचे आहेत असं म्हटलं जाऊ शकत नाही.  यात सारा जांभळा टॉप, शॉर्ट्स आणि कॅप घालून दिसत आहे. ती खूप आनंदी आहे.

रियाला १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तिचा अर्ज जामीन अर्जसुद्धा मुंबईतल्या विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. विशेष न्यायालयाने रिया आणि शोविकसह अब्दुल बसित, झैद विलात्रा, दीपेश सावंत आणि सॅम्युअल मिरांडा यांचाही जामीन अर्ज फेटाळला आहे. रियाने अटकेनंतर दुसऱ्यांदा जामिनासाठी अर्ज केला होता. अटक झाल्यानंतर न्यायालयाने तिला पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी सुनावली होती.