मोदींच्या बायोपिकनंतर आता ममता बॅनर्जींच्या ट्रेलरवर बंदी

चित्रपटाला सीबीएफसीचे प्रमाणपत्र मिळाले नसल्याने सेंसॉर बोर्डाने तीन वेबसाइट्सवरून या चित्रपटाचा ट्रेलर हटविण्याचे आदेश दिले आहे.

Mumbai

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील चित्रपटाच्या प्रदर्शनास मनाई केल्यानंतर आता तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यावरील चित्रपटाच्या ट्रेलरवर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. ममता बॅनर्जी यांच्यावर ‘बाघिणी’ हा चित्रपट लवकरच येत आहे. या चित्रपटाला सीबीएफसीचे प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे सेंसॉर बोर्डाने तीन वेबसाइट्सवरून या चित्रपटाचा ट्रेलर हटविण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या सीईओकडून याबाबतचा अहवाल देखील मागितला आहे.

आयोगाच्या नियमांचे उल्लघंन

अहवाल मिळाल्यानंतर निवडणूक आयोग हा चित्रपट पाहणार असून या चित्रपटाचा ट्रेलर दाखवणाऱ्या तिन्ही वेबसाइटने निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन केले नाही, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. सेंसर बोर्डाने या चित्रपचाला प्रमाणपत्र दिलेले नसताना देखील वेबसाइटवर या चित्रपटाचा ट्रेलर दाखविण्यात आल्याने या संदर्भातील तक्रार आल्यानंतर कारवाई केल्याचे आयोगाने सांगितले आहे.

मोदींच्या वेबसिरीजवर ही बंदी

निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वेबसिरीजवर नुकतीच बंदी आणली आहे. यासोबतच आयोगाने मोदींच्या आयुष्यावर आधारलेली वेबसिरीज Modi-Journey of a Common Man वर ही बंदी आणली आहे. शनिवारी आयोगाने या वेबसिरीजच्या सगळ्याच सर्व भागांच्या स्ट्रिमिंगवर बंद करण्याचे आदेश ईरोस नाऊला दिले आहे.