घरताज्या घडामोडी३४ जणांच्या चौकशीनंतर पोलीस करणार व्हायरल ट्विट आणि स्क्रिनशॉटचा तपास!

३४ जणांच्या चौकशीनंतर पोलीस करणार व्हायरल ट्विट आणि स्क्रिनशॉटचा तपास!

Subscribe

१४ जूनला सुशांतने आपल्या वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती, या आत्महत्येचा सध्या वांद्रे पोलिसांकडून तपास सुरु आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत वांद्रे पोलिसांनी ३४ जणांची चौकशी करुन त्यांचा जबाब नोंदवून घेतली आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याच्या अधिकृत ट्विटरवरुन काही ट्विट आणि स्क्रिनशॉट व्हायरल झाले होते,  त्याचा आता तपास सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

१४ जूनला सुशांतने आपल्या वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती, या आत्महत्येचा सध्या वांद्रे पोलिसांकडून तपास सुरु आहे. या घटनेनंतर त्याच्या राहत्या इमारतीचे सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, मात्र त्याच्या राहत्या घरी सीसीटिव्ही कॅमेरे नव्हते. फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट अद्याप पोलिसांना प्राप्त झाला असून ते रिपोर्ट लवकरच मिळतील असेही पोलिसांनी सांगितले. सोमवारी सिनेनिर्माता-दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांची चौकशी केली होती. त्यानंतर त्यांची जबाब नोंदवून घेण्यात आला. संजय लिला भन्साळीने सुशांतला चार चित्रपटाची ऑफर दिली होती. या चित्रपटासाठी ते सुशांतला साईन करणार होते, मात्र सुशांतकडून तारखा मिळू शकल्या नाहीत. त्यामुळे त्याच्या जागी दुसर्‍या कलाकाराला घ्यावे लागले असेही त्यांनी आपल्या जबाबात सांगितले आहे.

- Advertisement -

सुशांतच्या आत्महत्येचा सर्व बाजूंनी पोलीस तपास करीत आहेत. या आत्महत्येशी संबंधित जास्तीत जास्त माहिती गोळा करण्यावर पोलिसांनी भर दिला आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याच्या अधिकृत ट्विटरवरुन तीन ट्विट आणि काही स्क्रिनशॉट व्हायरल झाले होते, ते ट्विट आणि स्क्रिनशॉट कोणी पाठविले होते. याचा आता पोलिसांकडून तपास सुरु आहे. दुसरीकडे सुशांतच्या सर्व सोशल अकाऊंटची माहिती जाणून घेण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहे. त्यात त्यांनी त्याच्या डिप्रेशनविषयी काही माहिती शेअर केली होती का याचाही तपास सुरु असल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने बोलताना सांगितले.


हे ही वाचा – जबरदस्त! BSNL ने ग्राहकांना दिला 5GB हायस्पीड डेटा फ्री!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -