Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन तयार रहा ! प्रभास घेऊन येतोय बिग बजेट 'राधेश्याम' चित्रपट

तयार रहा ! प्रभास घेऊन येतोय बिग बजेट ‘राधेश्याम’ चित्रपट

प्रभासने इस्टाग्राम अकाउंटवर सहा विविध भाषांमध्ये शेअर केले पोस्टर

Related Story

- Advertisement -

सुपरस्टार प्रभास सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे खूपच चर्चेत आला आहे. त्यातच नव वर्षात प्रभासाने बिग बजेट ‘राधेश्याम’ चित्रपटाची घोषणा करत चाहत्यांना सरप्राईज केले आहे. या चित्रपटात सुपरस्टार प्रभातसह अभिनेत्री पूजा हेगडे महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.

‘राधेश्याम’ या चित्रपटाच्या पोस्टर्सने कमी वेळात अधिक लोकांनी पाहिल्याने नवा रेकॉर्ड रचला आहे. या चित्रपटातील प्रभास आणि पूजा हेगडेचा फस्ट लूक समोर आला आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना खूप दिवसांनी प्रभास पूजाच्या केमिंस्ट्रीचा रोमँटिक ड्रामा पाहता येणार आहे. त्यामुळे लाखो दिलो की धडकन प्रभास आणि नेहमी हसत असणारी हॅट पुजा यांच्यातील केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर जादू करेल याच शंका नाही.

- Advertisement -

२०२१ या नव वर्षाच्या मूहुर्तावर प्रभासने आपल्या ऑफिशियल इस्टाग्राम अकाउंटवर या चित्रपटाचे फस्ट पोस्टर रिलीज करत ‘तो तुमचे ह्रदय जिंकायला आला असून तो तुम्हाला पुन्हा प्रेमात पाडेल’ असे क‌ॅप्शन लिहिले आहे. तसेच पूजा हेगडेने देखील या चित्रपटाचे पोस्टर आपल्या सोशल मिडिया अकांटवर शेअर केला आहे. या चित्रपटाचे पोस्टर सहा विविध भाषांमध्ये रिलीज करण्यात आले आहे.

या फस्ट पोस्टरमध्ये प्रभास एकदम सिंपल एलीगेंट लुकमध्ये दिसत असून त्याने काळ्या रंगाचा स्वेटशर्टसह मॅचिंग पँट परिधान केली आहे. त्यासोबतच काळ्या रंगाच्या होगन शैलीच्या टोपीमुळे त्याचा हटके लूकला ‘चार चॉंद’ लागले आहेत. प्रभासचा सिंपल हटके लूक पाहता चाहत्यांमध्ये ‘राधे श्याम’ या आगामी चित्रपटाला घेऊन अधिक उत्सुकता दिसून येत आहे. या पोस्टरवर चाहत्यांच्या कमेंटच्या वर्षाव होत आहे.

- Advertisement -

राधा कृष्ण कुमार यांना ‘राधेश्याम’ या चित्रपटाचे लिखाण, दिग्दर्शन केले आहे. तर जस्टिन प्रभाकरन यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. या चित्रपटात सुपरस्टार प्रभास आणि पूजासह सचिन खेडेकर, भाग्यश्री, मुरली शर्मा, कुणाल रॉय कपूर अशी बडी स्टारकास्ट पाहयला मिळणार आहे. या बहुभाषिक बिग बजेट चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केली आहे.

 

- Advertisement -