प्रकाश झा यांच्या त्या ‘कृती’ने मी अस्वस्थ झाले; अहाना कुमरा

Mumbai
aahana kumra Lipstick under my burqa movie scene
'लिप्स्टिक अंडर माय बुरखा' चित्रपटातील अहानाचा बोल्ड सिन

बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या महिला आता आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उचलायला लागलेल्या आहेत. मी टू चळवळीने तर एकप्रकारे अभिनेत्री, मॉडेल आणि पत्रकार महिलांच्या हातात तर एकप्रकारचे हत्यारच दिले. आता अभिनेत्री आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडताना आपण नेहमीच ऐकत असतो. सध्या अहाना कुमरा या अभिनेत्रीने देखील आपल्यावर बेतलेला एक कठिण प्रसंग एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे. अहाना कुमरा ही ‘लिप्स्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाशझोतात आली होती.

View this post on Instagram

Lipstick team

A post shared by lipstick💄 (@lipstickundermyburkha__) on

प्रकाश झा हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आहेत. राजकारण आणि समाजकारणावर कमर्शियल चित्रपट बनवण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. ‘लिप्स्टिक अंडर माय बुरखा’ चित्रपटाचे ते निर्माते होते. अहानाने सांगितल्याप्रमाणे “एके दिवशी चित्रपटाचा बोल्ड सीन चित्रित करत असताना झा सेटवर आले. त्या बोल्ड सीन दरम्यान त्यांनी माझ्याकडे पाहून कमेंट पास केली. त्या कमेंटमुळे मी बोल्ड सीन करताना अस्वस्थ झाली.”

View this post on Instagram

Very pretty girl 😍😘

A post shared by lipstick💄 (@lipstickundermyburkha__) on

त्यानंतर अहाना चांगलीच भडकली. त्यानंतर तिने थेट चित्रपटाची दिग्दर्शिका अलंक्रिता श्रीवास्तवला गाठले. ‘प्रकाश झा हे चित्रपटाचे निर्माते असले म्हणून काय झालं. ते माझे दिग्दर्शक नाहीत. मग ते का कमेंट पास करत आहेत? प्रकाश झा यांचा मी आदर करते. पण त्यांनी कमेंट पास करणे योग्य नाही.’, अशी भावना अहानाने व्यक्त केली. दिग्दर्शिका अलंक्रिताने मग प्रकाश झा यांना सेटवरून जायला सांगितले. प्रकाश झा यांनी देखील प्रसंगावधान राखत सेटवरून काढता पाय घेतला. त्यानंतर ते पुन्हा कधीच लिप्स्टिकच्या सेटवर आले नाहीत.

‘लिप्स्टिक अंडर माय बुरखा’ हा चित्रपट महिलांच्या लैंगिक जाणीवा आणि समाजाची त्यावरची प्रतिक्रिया यावर आधारीत होता. चार वेगवेगळ्या वयातील महिलांची ही गोष्ट आहे. भोपाळ शहरात ही गोष्ट घडत असते. चारही महिला समाजाने घालून दिलेल्या भंपक मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करतात. त्यात त्या यशस्वी देखील होतात. या चित्रपटात अहाना कुमरा सोबत, रत्ना पाठक शाह, कोंकना सेनशर्मा आणि प्लाबिता बोरठाकूर यांनी काम केलेले आहे. मराठमोळा वैभव तत्त्ववादी देखील एका छोट्या भूमिकेत आहे.

 

अहानाचा बॉलिवूडचा प्रवास तितकासा चांगला राहिलेला नाही. सुरुवातीच्या दिवसात तिला मोठा संघर्षाला सामोरे जावे लागले होते. त्याबद्दल अहाना सांगते की, “एक माणूस मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा. मी जेव्हा बॉलिवूडमध्ये आले तेव्हा माझे तत्त्व मला स्वस्थ बसू देईनात. आजपर्यंत मी त्या चुकीच्या लोकांना संपर्क केलेला नाही.” अहानाने अनेक वेबसिरीजमध्ये काम केलेले आहे. इनसाईड एज, रंगबाज अशा तिच्या काही जागलेल्या वेबसिरीज आहेत.