घरमनोरंजनबॉबी देओलची वेब सीरीज वादाच्या भोवऱ्यात; करणी सेनेकडून बंदीची मागणी

बॉबी देओलची वेब सीरीज वादाच्या भोवऱ्यात; करणी सेनेकडून बंदीची मागणी

Subscribe

करणी सेनेच्या राज्य संघटनेकडून प्रकाश झा यांना ही कायदेशीर नोटीस

बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलने डिजिटल विश्वात ‘आश्रम’ या वेब सीरीजच्या माध्यमातून पदार्पण केले आहे. बॉबी देओलचे धमाकेदार पुनरागमनाला त्याच्या चाहत्यांनी छान प्रतिसाद दिला. परंतु, प्रकाश झा यांची ही वेब सीरीज प्रदर्शनापूर्वीच वादात सापडली आहे. बॉबी देओल चा ‘आश्रम’ या वेब सीरीजचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, धार्मिक भावना दुखावल्याचे म्हणत, करणी सेनेने प्रकाश झा यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

करणीसेनेने या पाठवलेल्या नोटीसमध्ये असे नमूद केले आहे की, ‘या वेब सीरीजमधून धार्मिक परंपरा, आश्रम धर्म, प्राचीन सांस्कृतिक परंपरा यांना लक्ष्य करण्यात आले आहे’. तसेच करणी सेनेच्या राज्य संघटनेकडून प्रकाश झा यांना ही कायदेशीर नोटीस पाठवली आहे. प्रकाश झा व्यतिरिक्त जिथे ही वेब सीरीज प्रदर्शित करण्यात आली, त्या ‘एमएक्स प्लेयर’ या ओटीटी प्लॅटफॉर्मला देखील कायदेशीर नोटीस पाठवली गेली आहे.

- Advertisement -

करणी सेनेचे सरचिटणीस सुरजित सिंह यांच्या वकिलाने पाठवलेल्या कायदेशीर नोटीसमध्ये असे म्हटले आहे की, ‘प्रकाश झा यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आश्रम-चॅप्टर-२- द डार्क साइड’ नावाच्या वेब सीरीजमुळे लोकांच्या भावनांवर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला आहे. शिवाय लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. ही वेब सीरीज येणाऱ्या तरुण पिढीमध्ये हिंदू धर्माबद्दल नकारात्मकता पसरवणारी ठरणार आहे.’ यासह वेब सीरीजच्या अधिकृत ट्रेलरमध्ये दर्शविलेले वैशिष्ट्य कोणत्याही व्यक्तिमत्वाला लक्ष्य करत नाही. तर, या ट्रेलरमधून पुरातन परंपरा, प्रथा, हिंदू संस्कृती, आश्रम धर्म यांना निशाणा बनवले जात आहे. ज्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत’, असेही या नोटीसमध्ये म्हणण्यात आले आहे.

- Advertisement -

वेब सीरीजवर बंदी घालण्याची मागणी

‘आश्रम’ या वेब सीरीजमध्ये बॉबी देओल मुख्य भूमिका साकारत आहे. त्याचे पात्र एका ढोंगी बाबाची कथा सांगणारे आहे. या वेब सीरीजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला असला, तरी आता दुसऱ्या भागाच्या प्रदर्शनापूर्वीच ही वेब सीरीज वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. धार्मिक भावना दुखावल्याचे कारण देत, करणी सेनेने यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

‘आश्रम’ या वेब सीरीजमध्ये बॉबी देओल व्यतिरिक्त अदिती पोहनकर, चंदन रॉय सान्याल, दर्शन कुमार, अनुप्रिया गोयंका, अध्ययन सुमन आणि इतर अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ११ नोव्हेंबर रोजी ‘आश्रम-चॅप्टर-२- द डार्क साइड’ एमएक्स प्लेयरवर प्रदर्शित होणार आहे.


परिणीती की सायना नेहवाल ओळखणंही झालं कठीण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -