घरमनोरंजन‘युथट्यूब’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘युथट्यूब’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

‘युथट्यूब’ हा नवीन चित्रपट १ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अॅक्टिंग अकॅडमीच्या ३०० विद्यार्थ्यांनी एकाच सिनेमात काम केले आहे.

काही माणसं पॅशनेटली काम करत असतात. हेच पॅशन त्यांच्या प्रत्येक कामाला वेगळा आयाम देत असतो. ‘गोड गुपित’, ‘ना.मुख्यमंत्री गणप्या गावडे’, ‘सुंदर माझं घर’यासारखे वेगळे चित्रपट देणाऱ्या प्रमोद प्रभुलकर यांनी आजवर दिग्दर्शित केलेल्या चित्रपट गाजले आहेत. या चित्रपटांच्या यशानंतर ‘युथट्यूब’ हा नवीन चित्रपट १ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कलेचे माध्यम कोणतेही असो नवीन, सर्जनशील विचारांची निर्मिती आणि त्याची देवाणघेवाण होणे गरजेचे असते. कलेच्या बाबतीत हे सातत्याने घडणे आवश्यक असते. नवनवीन कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ घडत जातात तेव्हाच सर्जनशीलतेला वाव मिळत असतो. याच विचारसरणीतून दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर आणि मधुराणी प्रभुलकर यांनी मिरॅकल्स अक्टिंग अकॅडमी’ची स्थापना केली. अनेक उत्तम कलाकार मिरॅकल्स अक्टिंग अकॅडमी’ च्या माध्यामतून प्रकाशझोतात आले. त्यांना भक्कम पाठिंबा देण्याचं काम दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर व अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांनी नेटाने केले.

३०० हून अधिक विद्यार्थी झळकणार

‘युथट्यूब’या नव्या चित्रपटातही ‘मिरॅकल्स अक्टिंग अकॅडमी’तील ३०० विद्यार्थी या सिनेमामध्ये झळकणार आहेत. एकाच अॅक्टिंग अकॅडमीच्या ३०० विद्यार्थ्यांनी एकाच सिनेमात काम करण्याची ही पहिलीच वेळ असून मनोरंजन सृष्टीच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले असावे. आजकाल फेसबुक, ट्विटर आणि व्हॉटस अॅप हे तर आपल्या कुटुंबाचे सदस्य झालेत. हल्ली आपण घरातल्यांसमोर किती व्यक्त होऊ माहित नाही, पण सोशल मीडियावर प्रत्येकजण व्यक्त होतोच. सोशल मीडियाच्या आहारी जाऊन सद्सदविवेकबुद्धीचा विसर पडत कुटुंबातील संवाद हरवत चाललाय. हाच धागा पकडून ‘युथट्यूब’ चित्रपटाची कथा लिहिण्यात आली आहे.

- Advertisement -

चित्रपट कसा करावा याचे ज्ञान आवश्यक

आपल्या या नव्या कलाकृतीबद्दल बोलताना प्रमोद सांगतात की, तुम्ही विषयाशी प्रामाणिक राहून तुमचा चित्रपट करायला पाहिजे. तुम्हाला नेमका कसा चित्रपट करायचा आहे, हे समजलं पाहिजे. तरच तुम्हाला चित्रपटाच्या माध्यामतून जो विषय प्रेक्षकांपर्यंत पोहचवायचा आहे तो सहजरीत्या पोहचवता येतो. युथट्यूबच्या निमित्ताने प्रेक्षकांना एक चांगली कलाकृती पाहिल्याचा आनंद मिळेल.

Nashik Edition start from 18 January
आपलं महानगरची नाशिक आवृत्ती १८ जानेवारी पासून सुरु
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -