प्रनूतन चौथ्या पिढीतली नायिका

Mumbai
Pranutan Bahl

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये तीन गोष्टींसाठी सलमान खानचे कौतुक केले जाते. त्यासाठी त्याला वेगवेगळी नावे दिलेली आहेत. आपल्या पद्धतीने तो सामाजिक कार्य करतोच आहे. भाईजान म्हणून त्याची वेगळी ख्याती आहे. बर्याचशा नवकलाकारांना विशेषत: स्टारसन्सना आपल्या निर्मितीत प्रथम हिरो-हिरोईन होण्याचा मान देत असल्यामुळे तुस्सी ग्रेट हो! अशीही त्याची ओळख करुन दिली जाते. दुसर्याच्या चित्रपटात काम करत असताना स्वत:च्याही निर्मितीला आवर्जून वेळ देणारा तो एक निर्माता आहे. आता त्याने आणखीन एका स्टारगर्लला आपल्या चित्रपटासाठी करारबद्ध केलेले आहे. ती दुसरीतिसरी कोणीही नसून प्रख्यात अभिनेत्री नूतन हिची ती नात आहे आणि अभिनेते मोहनिश बेहेल याची ती कन्या आहे. प्रनूतन बेहेल ही ‘नोटबुक’ या चित्रपटात दिसणार आहे.

प्रनूतनच्या बाबतीत एक चांगली गोष्ट घडते आहे. याच महिन्यात अभिनेत्री नूतन व शोभना समर्थ यांचा स्मृतीदिन आहे. अशा पार्श्वभूमीवर तीच्या चित्रपटाचे प्रमोशन केले जात आहे हे महत्त्वाचे म्हणावे लागेल. इक्बाल यांनी या चित्रपटाची जुळवाजुळव केलेली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांनी आपल्यातील अभिनेत्रीला स्वीकारले तर मुळचा वकिलीचा व्यवसाय सोडण्याची तीने तयारी दाखवलेली आहे. ओळखीच्या बळावर चित्रपट मिळवणे तीला योग्य वाटत नाही. रितसर फोटोसेशन, ऑडिशन देऊन ती या चित्रपटात आलेली आहे. पुढच्या महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.