घरमनोरंजनप्रार्थना लावणार 'मस्का'

प्रार्थना लावणार ‘मस्का’

Subscribe

मितवा, कॉफी आणि बरेच काही, मि.अ‍ॅण्ड मिसेस सदाचारी यांसारख्या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आता प्रेक्षकांना मस्का लावताना दिसणार आहे. ती मस्का लावणार म्हणजे नेमके काय करणार आहे, असा सवाल तुम्हाला पडला असेल ना. अहो…तिच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘मस्का’ आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन व लेखन प्रियदर्शन जाधवने केले असून हा रॉमकॉन चित्रपट आहे.

या चित्रपटात तिने माया नामक भूमिका साकारली आहे. तिने साकारलेल्या भूमिकांमध्ये ही वेगळी असल्याचे प्रार्थना सांगते. ती म्हणाली की, मस्कामधील माझा लूक व भूमिका खूप वेगळी आहे. या चित्रपटाचा टीझर पाहून अर्धे लोक माझ्याबद्दल चांगले बोलत आहेत तर अर्धे लोक वाईट बोलत आहेत. तुला अशा भूमिकेत कधी पाहिले नव्हते. मला काही लोकांनी तुम्हाला असे पात्र शोभत नाही वगैरे सांगितले. हीदेखील माझ्यासाठी प्रशंसा आहे. साचेबद्ध भूमिका करण्यापेक्षा माझ्या व्यक्तिमत्त्वापेक्षा वेगळी भूमिका करण्याची संधी मला या चित्रपटामुळे मिळाली. त्यामुळे ही भूमिका करायला जास्त मजा आली. माझ्यासाठी ही भूमिका खूप आव्हानात्मक होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -