घरमनोरंजनसचिन आणि प्रार्थनाचा ‘लव्ह यु जिंदगी’

सचिन आणि प्रार्थनाचा ‘लव्ह यु जिंदगी’

Subscribe

प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना आपलासा वाटणारा आणि नव्याने आयुष्यावर प्रेम करायला शिकवणारा आगामी मराठी चित्रपट ‘लव्ह यु जिंदगी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना आपलासा वाटणारा आणि नव्याने आयुष्यावर प्रेम करायला शिकवणारा आगामी मराठी चित्रपट ‘लव्ह यु जिंदगी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एस. पी. प्रोडक्शन्स निर्मित आणि मनोज सावंत दिग्दर्शित ‘लव्ह यु जिंदगी’ मध्ये अभिनेता सचिन पिळगांवकर महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. अनिरुध्द बाळकृष्ण दाते या एका सामान्य गृहस्थाच्या भूमिकेतील सचिन पिळगांवकर यांचे प्रमुख पोस्टर नुकतेच सोशल मीडीयावर प्रदर्शित करण्यात आले होते. तर सोबतच अभिनेत्री प्रार्थना बेहेरेदेखील दिसत आहे.

हलकीफुलकी लव स्टोरी

वय झाले असले तरी आयुष्य आनंदाने जगण्याची इच्छा मनात बाळगणारा, असा हा अनिरुध्द दाते. पण आयुष्यातील खरा आनंद म्हणजे तारुण्य मानणाऱ्या अनिरुध्दाची तारुण्यात पुन्हा एकदा उपभोगण्याची इच्छा आणि पुन्हा यंग होण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न हा अनिरुध्द दातेचा एकंदरीत प्रवास या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अशा या हलक्या-फुलक्या, सुंदर आणि प्रेमळ चित्रपटात सचिन पिळगांवकर यांच्यासोबत आणखी कोणते कलाकार असतील हे जाणून घेण्याची इच्छा नक्की अनेकांची असेल.

- Advertisement -

सचिन – प्रार्थना यांची केमिस्ट्री 

सचिन पिळगांवकरांसोबत आणखी एका प्रमुख भूमिकेत कोणती अभिनेत्री दिसणार आहे याची उत्सुकता सगळ्यांच्याच मनात होती आणि ही उत्सुकता लक्षात घेता नुकतेच या चित्रपटाचे आणखी एक नवे-कोरे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आणले आहे. तर आपल्या हास्याने आणि सहज-सुंदर अभिनयाने सर्वांची मनं जिंकणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे या चित्रपटातसचिन पिळगांवकर यांच्यासोबत महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. नवीन पोस्टरच्या माध्यमातून या चित्रपटातील प्रार्थना बेहरेचा लूक नक्की कसा असेल याचा अंदाज तुम्हांला आता आलाआहे. ‘लव्ह यु जिंदगी’मधील कूल आणि स्टायलिश लूकमधून प्रार्थना तिच्या चाहत्यांना एका आगळ्या-वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे आणि तिच्या भूमिकेची झलक आपल्याला लवकरच टीझरमधून दिसेल.

५ नोव्हेंबरला टीझर रिलीज

सचिन बामगुडे निर्मित ‘लव्ह यु जिंदगी’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनासह मनोज सावंत यांनी चित्रपटाची कथा देखील लिहिली असून येत्या १४ डिसेंबरला आयुष्यावर नव्याने प्रेम करायला लावणारा हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. तर ५ नोव्हेंबर रोजी याचा टीझर लाँच होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -