वेबसीरिजमध्ये दिसणार प्रार्थना बेहेरे

वेबसीरिजमध्येच नाही तर चित्रपटातही दिसणार प्रार्थना

Mumbai

‘मितवा’, ‘मस्का’, ‘कॉफी आणि बरंच काही’ यासह ‘फुगे’, ‘अनान’, ‘होस्टेल डेज’, ‘व्हॉट्सअप लग्न’, ‘रेडिमिक्स’ ‘ती आणि ती’यांसारखे चित्रपट अभिनेत्री प्रार्थनाने केले. मात्र आता प्रार्थना कोणत्या नव्या चित्रपटात दिसणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना होती. त्यात तिच्या घरची निर्मितीसंस्था सुरू झाल्यावर ती घरच्या नव्या कलाकृतींमध्ये दिसणार असेही तिला विचारले जात होते.

नवं फोटोशूट व्हायरल

मात्र, प्रार्थना एका वेबसीरिजमध्ये दिसणार असून केवळ वेबसीरिजमध्येच नाही तर चित्रपटातही दिसणार आहे, असे समजते आहे. नव्या फोटोशूटमुळे प्रार्थना सध्या चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिचे काही फोटोज व्हायरल देखील झाले आहेत.

चाहत्यांना वाट पहावी लागणार

प्रार्थनाचा नवरा अभिषेक जावकर चित्रपट आणि वेबसीरिजची निर्मिती करत असून या दोन्ही कलाकृतींमध्ये ती दिसणार आहे. यातील तिच्या भूमिकाही हटके आहेत. सध्या या निर्मिती आणि त्यातल्या भूमिकांविषयी सांगता येणार नाही, मात्र या दोन्हीकरिता चाहत्यांना वेगळी प्रार्थना पाहायला मिळणार असून चाहत्यांना थोडी वाट पहावी लागणार आहे, हे मात्र नक्की….