प्रेग्नेंट एमी जॅक्सन युरोपमध्ये करतेय धम्माल; फोटो व्हायरल

सतत अॅक्टिव असल्याने आपल्या चाहत्यांना तिच्या प्रेग्नंसीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते

Mumbai

बॉलिवूड अभिनेत्री एमी जॅक्सन आजकाल तिचा प्रेग्नंसीचा काळ खूपच आनंदात घालवताना दिसत आहे. एमी जॅक्सन सोशल मीडियावर आपला अधिक वेळ घालवत असते. त्यामुळे, सतत अॅक्टिव असल्याने आपल्या चाहत्यांना तिच्या प्रेग्नंसीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सोशल मीडियावर नुकतेच तिने विदेशी ट्रिपचे काही फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहे.

एमी जॅक्सनने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर युरोपच्या वॅकेशनचे काही फोटो पोस्ट केले आहे. या शेअर केलेल्या फोटोमध्ये एमीचा वेगवेगळा अंदाज तिच्या चाहत्यांना बघायला मिळत आहे. एमी तिच्या बेबी बंपसोबत सुंदर पोज असणारे फोटो सर्वांचेच लक्ष वेधत त्या फोटोवर चाहत्यांच्या कमेंटचा वर्षाव होताना दिसतोय.

यासोबतच एमीचा बदललेला लूक देखील अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. या वेगवेगळ्या लूक्सच्या फोटोंना चाहत्यांकडून पसंती मिळत असून सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसताय.

यासोबतच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये एमी तिच्या मैत्रिणींसह स्वितझरलॅंड, पॅरिस,लंडन या ठिकाणीही खूप धम्माल करताना दिसत असून ३१ मार्च २०१९ रोजी तिच्या प्रेग्नंसीची ऑफिशिअल तारिख सांगण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here