Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी कुत्र्याने वाचवले प्रिती झिंटाचे प्राण!

कुत्र्याने वाचवले प्रिती झिंटाचे प्राण!

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडची डिंपल गर्ल प्रिती झिंटा सोशल मीडियावर सध्या फारच अॅक्टिव असते. अनेकवेळा तिच्या ट्विटमुळे ती चर्चेत असते. काही वेळापूर्वी तिने आपल्या कुत्र्यासोबत ट्विटरवर फोटो शेअर केला. या फोटोसोबत तिने कुत्र्याने आपले प्राण कसे वाचवले हे सांगितलं आहे. या ट्विटमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने असं लिहिलं आहे की, आपला कुत्रा जेव्हा आपल्याला बुडण्यापासून वाचविण्यासाठी जकुझीमध्ये (बाथ डब) उडी मारतो तेव्हा हे खरं प्रेम असतं. खरंतर जकूझीमध्ये (बाथ डब) कुणीही बुडत नाही. तरी पण प्रितीच्या कुत्र्याचे तिच्यावर फार प्रेम होते त्यामुळे त्याला प्रिती पाण्यात बुडत असल्याचं वाटलं. त्यामुळे त्याने जकुझीमध्ये उडी मारली.

- Advertisement -

प्रितीने पुढे असं लिहिलं की, जोपर्यंत आपण बाथ टबमधून बाहेर येत नाही तोपर्यंत तो भडकला होता. माझ्या बाळासोबत हा एक सुंदर क्षण. प्रिती झिंटाच्या या ट्विटवर चाहते खूप प्रतिक्रिया देत आहेत. याअगोदर प्रितीने ट्विटवर एक फोटो शेअर केला होता. प्रिती झिंटाचा हा फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

- Advertisement -

‘दिल से’ या चित्रपटातून प्रिती झिंटाने बॉलिवूड चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटासाठी प्रितीला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता. हिंदी चित्रपटाव्यतिरिक्त प्रितीने तेलुगू, पंजाबी आणि इंग्रजी चित्रपट देखील केले आहेत.


हेही वाचा – प्रिया वॉरियर अडकली हॅकर्सच्या जाळ्यात


 

- Advertisement -