घरमनोरंजनराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची रणबीर - आलियाशी भेट

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची रणबीर – आलियाशी भेट

Subscribe

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी परदेशात ब्रम्हास्त्र चित्रपटाच्या टीमसोबत त्यांच्या सेटवर जाऊन भेट घेतली. यावेळी दिग्दर्शक अयान मुखर्जी, कलाकार रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची त्यांनी भेट घेतली.

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंदा हे सध्या तीन दिवसीय परदेशवारीवर आहेत. नुकतेच त्यांनी बुल्गारियाची राजधानी सोफिया येथे भेट दिली. यावेळी त्यांनी अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या ब्रम्हास्त्र या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या स्थळी जाऊन भेट दिली. यावेळी कोविंद यांच्यासोबत बुल्गारियाचे राष्ट्रपती रूमेन रादेव देखील उपस्थित होते. अयान मुखर्जी दिग्दर्शीत ब्रम्हास्त्र या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे प्रमुख भूमिका साकारत असून शेहनशाह अमिताभ बच्चनदेखील विशेष भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण बुल्गारियामधील सोफिया येथे सुरू आहे. या निमित्तीने भारत आणि बुल्गारिया या दोनही देशातील राष्ट्रपतींनी चित्रकरणाच्या ठिकाणी कलाकारांची भेट घेतली. चित्रपटातील कलाकारांसोबत घेतलेल्या भेटीचे छायाचित्र राष्ट्रपती कोविंद यांनी त्यांच्या ऑफिशिअल इंस्टाग्राम हॅंडलवर शेअर केली आहेत.

- Advertisement -

दोनही देशातील कला-संस्कृतीवर चर्चा

यावेळी दोनही देशातील राष्ट्रपतींनी इंडो-बुल्गारियाच्या क्रू मेंबर्ससोबत संवाद साधला. दोनही देशातील चित्रपट आणि सांस्कृतिक संबंधाबाबत त्यांनी चर्चा केली. या भेटी दरम्यान, रामनाथ कोविंद यांच्यासह त्यांची पत्नी, चित्रपटातील कलाकार रणबीर कपूर, आलिया भट्ट, दिग्दर्शक अयान मुखर्जी उपस्थित होते. ब्रम्हास्त्र हा एक रोमॅंटिक सुपर नॅचरल थ्रिलर चित्रपट असून पुढील वर्षी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने हा प्रदर्शीत केला जाणार आहे. या सिनेमात अभिनेत्री मौनी रॉयदेखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

 

View this post on Instagram

 

Honour to have the president of india, visit the sets of Brahmastra in Bulgaria.

A post shared by Ayan Mukerji Fan Page (@ayanmukerji83) on

 

View this post on Instagram

 

We prep for BRAHMASTRA .. RANBIR , Alia , Ayan .. all except moi .. I seem to having an outer space experience ..

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on

- Advertisement -

दिग्दर्शक अयान मुखर्जी यानेही त्याच्या इंस्टा हँडलवर फोटो शेअर केला आहे.

बिग बी यांचे ब्रम्हास्त्र कनेक्शन

यापूर्वी बिग बी अमिताभ बच्चन यांनीही त्यांच्या इंस्टा हँडलवर चित्रपटाच्या कलाकार आणि दिग्दर्शकासोबतचा फोटो शेअर केला होता. ब्रम्हास्त्र चित्रपटासाठी तयारी करत आहोत. तसेच मी सध्या बाहेरील वातावरण अनुभवत आहे. असे अमिताभ यांनी पोस्टसोबत लिहिले होते. या फोटोमध्ये अयान मुखर्जी, रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन दिसत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -