घरमनोरंजनपंतप्रधानांचा बायोपिक ५ एप्रिलला प्रदर्शित होणार नाही

पंतप्रधानांचा बायोपिक ५ एप्रिलला प्रदर्शित होणार नाही

Subscribe

पंतप्रधान नरेंदी मोदी यांच्या जीवनावर आधारीत बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नरेंद्र मोदींची भुमिका अभिनेता विवेक ओबेरॉय दिसणार आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. विवेकचा नरेंद्र भुमिकेचा पहिला लूक प्रेक्षकांनी बघितला. या चित्रपटाचं दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केलं आहे. हा चित्रपट ५ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. आता हा चित्रपट १२ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकमध्ये मोदिंच्या भुमिकेत विवेक ऑबेरॉय तर अमित शहा यांच्या भुमिकेत अभिनेता मनोज जोशी दिसणार आहेत. तर मोदींच्या आईच्या  म्हणजेच हिराबेनच्या भुमिकेत जरीना वहाब दिसणार आहे. या चित्रपटातून नरेंद्र मोदी यांच्या जीवनप्रवास रूपेरी पडद्यावर अनुभवता येणार आहे.

- Advertisement -

चित्रीकरणादरम्यान विवेकला झाली दुखापत

या चित्रपटाच्या शुटींगदरम्यान विवेकच्या पायाला दुखापत झाली होती. त्याच्या पायाला टाके पडले होते. उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये चित्रीकरण सुरू असताना विवेकला दुखापत झाली. विवेक ऑबेरॉय हर्षिल धराली व गंगाच्या किनारी शुटींग करत होता. त्यावेळी विवेक अनवाणी गंगा किनारी चालत होता. त्यावेळी त्याच्या पायात झाडाची टोकदार फांदी पायात घुसली. त्यावेळी त्याच्या टाके घालावे लागले. मात्र पायाला दुखापत होऊन देखील विवेकने चित्रीकरण सुरू ठेवले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -