‘प्रिया वारियरच्या लोकप्रियतेचा ना हेवा वाटतं ना ईर्षा’

‘ओरू अदार लव्‍ह’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच प्रिया लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. मात्र तेवढी लोकप्रियता रोशनला मिळाली नाही. परंतु 'मला या बाबत ना हेवा वाटत ना ईर्षा', असे मत रोशननं व्यक्त केलं आहे.

Mumbai
'Priya Warriors popularity is not jealous or irritated'
प्रिया आणि रोशन

मागील वर्षात ‘एक्सप्रेशन क्वीन’ म्हणून नवारुपाला आलेली प्रिया प्रकाश वारियर आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्यावर्षी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रिया वॉरियरचा २६ सेकंदाचा एक छोटासा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये तिने एका मुलाकडे पाहून डोळा मारतानाचे जे काही एक्स्प्रेशन्स दिले होते, त्यावर संपूर्ण जग घायाळ झालं होतं. भारताबाहेरही हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. त्याचबरोबर या व्हिडिओतून जितकी प्रसिद्धी प्रियाला मिळाली तेवढी प्रसिद्धी रोशन अब्दुल रहूफच्या वाट्याला मात्र आली नाही. असं असलं तरी आपल्याला प्रियाच्या लोकप्रियतेची ईर्षा वाटत नाही असं मोठ्या मनानं रोशननं कबुल केलं आहे.

प्रियाच्या लोकप्रियतेबद्दल मला ना हेवा नाही ईर्ष्या

‘ओरू अदार लव्‍ह’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच प्रिया लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. मात्र रोशनच्या वाट्याला तेवढी प्रसिद्धी आली नाही. पण याबद्दल आपली कोणतीच तक्रार नसल्याचं रोशननं म्हटलं आहे. ‘प्रिया माझी खूप चांगली मैत्रीण आहे. ती एका रात्री लोकप्रिय झाली यावर माझा विश्वासच बसत नाही. पण तिच्या लोकप्रियतेबद्दल मला ना हेवा वाटत; नाही ईर्ष्या. आम्ही दोघंही नवोदीत आहोत. त्यामुळे आमच्यात तुलना, स्पर्धा कधीच होतं नव्हती. तिचं नेहमीच चांगलं व्हाव हिच माझी सदिच्छा आहे’, अशी प्रतिक्रिया रोशननं दिली आहे.

‘किसिंग’ व्हिडिओला प्रियाच्या चाहत्यांकडून भरभरुन पसंती

दरम्यान, प्रिया आणि रोशनचा नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दोघंही ‘किसिंग’ करत आहेत. हा व्हिडिओ देखील सध्या झपाट्याने व्हायरल होत आहे. प्रिया वॉरियरचे चाहते सोशल मीडियावर तिच्या या व्हिडिओलाही भरभरुन पसंती देत आहेत. हा व्हायरल होत असलेला किसिंग सीन प्रिया प्रकाशच्या ‘ओरू अदार लव्‍ह’ या मल्ल्याळम डेब्यू चित्रपटातील आहे. हा चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रियाच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट म्हणजे ‘व्हॅलेंटाईन डे’ची भेटच म्हणावी. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या नव्या व्हिडिओमुळे फॅन्सची चित्रपटाविषयीची उत्सुकात वाढली असणार, यात काहीच शंका नाही.


वाचा – प्रिया वारियरच्या ‘या’ चित्रपटाविरोधात बोनी कपूर यांनी पाठवली कायदेशीर नोटीस

वाचा – प्रिया वॉरियरचा Kissing सीन व्हायरल…


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here