घरमनोरंजनप्रियंका तू गॉसिप करायला विसरु नकोस - करिना कपूर

प्रियंका तू गॉसिप करायला विसरु नकोस – करिना कपूर

Subscribe

बॉलिवूडची बेबो आणि देसी गर्ल लवकरच करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये दिसणार आहे. या शोमध्ये बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणार आहे.

हार्दिक पांड्याने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर ‘कॉफी विथ करण’ हा शो काही दिवसांपासून बंद झाला आहे. परंतु, लवकरच ‘कॉफी विथ करण’चा सहावा सिझन येणार आहे. या सिझनमध्ये बॉलिवूडची बेबो आणि देसी गर्ली एकत्र दिसणार आहे. लवकरच हा सिझन प्रदर्शित होणार आहे. या सिझनमध्ये देखील अनेक गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निक जोनसशी लग्न झाल्यानंतर प्रियंका चोप्रा आणि तैमूरमुळे सतत चर्चेत राहणारी करीना कपूर हे या शोमध्ये येणार आहेत. या शोमध्ये प्रियंका आणि करिना यांच्या चाहत्यांना बऱ्याच गोष्टीविषयी माहिती मिळणार आहे. या शोचा एक ट्रेलर सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. यामध्ये करन जोहरने एक प्रश्न प्रियंकाला विचारला असता प्रियंकाने मला माहीत नाही, असे उत्तर दिले. यावर करिनाने प्रियंका तू हे कसं विसरु शकतेस? असा प्रश्न विचारला आहे. त्याचबरोबर प्रियंका तू गॉसिप करायला विसरु नकोस, असेही करिना म्हटली आहे.

- Advertisement -

‘मला कोणाच्याही अफेअरबद्दल माहित नाही’

करण जोहरने प्रियंकाला प्रश्न विचारला की, ‘वरुन धवन कुणाला डेट करत आहे?’ यावर प्रियंकाने ‘मला माहित नाही’, असे उत्तर दिले आहे. त्यानंतर करणने परत प्रश्न विचारले की, ‘अच्छा आता तुला मग हॉलिवूडच्या कलाकारांच्या अफेरबद्दल माहित असेल?’ यावर प्रियंकाने ‘मला कुणाच्याही अफेअरबद्दल माहित नाही’, असे सांगितले. प्रियंकाच्या या उत्तरावर करिना म्हणाली की, ‘असू करु नकोस. तू जिथून आली आहेस, त्याचा विसर पाडू नकोस’. बॉलिवूडमध्ये विविध गॉसिप कशा बाहेर जातात, याविषयी या शोमध्ये हास्यास्पद तर्हेने चर्चा होताना दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -