हे काय भलतंच, म्हणे प्रियांका चोप्रा गरोदर?

अभिनेत्री प्रियांका चोप्रा गरोदर असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर भलताच पेव फुटलाय. मात्र प्रियांकाच्या आईने याबद्दल खुलासा केलाय, तो जरा वाचाच.

Mumbai
prayanka pregnant
प्रियांका गरोदर

अभिनेत्री प्रियांका चोप्रा गरोदर असल्याच्या बातम्यांना सोशल मीडियावर चांगलच उधाण आलं होतं. मात्र प्रियांकाची आई मधु चोप्रा यांनी ती गरोदर नसल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे तूर्तास तरी या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. देसी गर्ल प्रियांका चोप्रा दरवेळी काहीना काही कारणांमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त प्रियांका डेटवर गेली होती. त्यानंतर एका फॅशन शोमध्ये प्रियांकाने हजेरी लावली होती. या फॅशन शोमधील तिचे काही फोटो व्हायरल झाले असून या फोटोमुळेच ती गरोदर असल्याचा चर्चांना उधाण आले.

काय म्हणाल्या मधू चोप्रा..?

दरम्यान सोशलमीडियावर प्रियांका गरोदर नसल्याच्या खुलासा तिच्या आईने केला आहे. सदरच्या बातम्या व्हायरल झाल्या नंतर मी स्वतः तीला फोन करुन या बद्दल विचारणा केली. ती खुप थकलेली असल्यामुळे चुकीची पोज दिल्याने थोडसं पोट बाहेर आलं होतं. तसेच फोटोग्राफरने चुकीच्या अॅंगलने फोटो काढल्याने तसा फोटो आला असल्याचा निर्वाळा प्रियांकाच्या आईने दिला आहे. हा त्या फोटोग्राफरचा दोष असल्याचे सांगत प्रियांकाच्या आईने ती गरोदर असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

चर्चांना उधाण

डिसेंबर २०१८ मध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि गायक निक जोनास यांचा विवाह झाला. साखरपुड्या पासून ते लग्नाची मेहेंदी, संगीत, कपडे या मुळे त्यांचे लग्न चर्चेत राहीले. लग्नानंतर दोनच महिन्यात प्रियांका निकच्या बाळाची आई होणार असल्याच्या बातम्यांना उधाण आलं. भविष्यात हे दोघही स्वत:च आपल्या येणाऱ्या बाळाची गोड बातमी सांगतील, अशी भावना काही चाहते व्यक्त करत आहेत. दरम्यान ही बातमी जिथून उत्पन्न झाली त्या फॅशन शोमध्ये प्रियांकाने टाइट कपडे घातल्यामुळेच तीचं पोट बाहेर दिसू लागलं होतं, अशी माहिती समोर येत आहे. पण एका फोटोमुळे संपुर्ण कलाविश्वात भलतीच चर्चा सुरु झाली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here