घरमनोरंजनकथ्थक गुरू वीरू कृष्णन यांच्या निधनाने बॉलिवूडकर हळहळले!

कथ्थक गुरू वीरू कृष्णन यांच्या निधनाने बॉलिवूडकर हळहळले!

Subscribe

अभिनेते व कथ्थक गुरू वीरू कृष्णन यांनी शनिवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सांताक्रुझच्या स्मशानभूमीत वीरू यांच्या पार्थिवावर अंतसंस्कार करण्यात आले. बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींना त्यांनी कथ्थक हा नृत्यप्रकार शिकवला होता. यामध्ये प्रियांका चोप्रा,कतरिना कैफ,लारा दत्ता या अभिनेत्रींचा समावेश आहे. वीरु यांच्या निधनानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला. राजा हिंदूस्थानी , हम है राही प्यार के, इश्क सारख्या चित्रपटांमध्ये त्यांच्या अभिनयाची झलक सगळ्यांना बघायला मिळाली.

बॉलिवूडच्या कलाकारांनी ट्विटरद्वारे श्रद्धांजली वाहिली,”जेव्हा मी नीट नाचूही शकत नव्हते तेव्हापासून तुम्ही मला कथ्थक शिकवलात. नृत्यासाठी असलेला तुमचा संयम आणि जिद्द पाहून आम्ही केवळ कथ्थकबद्दलच नाही तर तुमच्याकडूनही खूप काही शिकण्याचा प्रयत्न केला. तुमची आठवण सदैव राहील गुरूजी,’ अशा शब्दांत प्रियांकाने भावना व्यक्त केल्या आहेत”.

- Advertisement -

सुनील शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टीनेही ट्विटरद्वारे गुरूजींना श्रद्धांजली वाहिली. ”मेहनत, शिस्त आणि कथ्थक या नृत्यप्रकारावर प्रेम करायला शिकवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार,” असं तिने लिहिलं.

ही अत्यंत दुख:द बातमी आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. मी त्यांची कथ्थक प्रति असणारी निष्ठा बघितली आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक विद्यार्थी घडवले आहेत. अशा शब्दात अभिनेत्री लारा दत्ताने ट्वीटरवर शोक व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -