‘प्रियांका चोप्रा आरएसएस’मध्ये’; सोशल मीडियावर ट्रोलर्सने घेरले

प्रियांकाला काही जणांनी ट्रोल केले असून सोशल मीडियावर मीम्‍स व्‍हायरल होत आहेत

Mumbai

बॉलिवूड अभिनेत्री नेहमी तिच्या अनोख्या स्टाईल स्टेटमेंटमुळे चर्चेत असते. नुकताच मीट गाला फेस्टिव्हलमध्ये तिने केलेल्या पेहराव आणि हेअर स्टाईलमुळे नेटकऱ्यांनी चांगलेच सोशल मीडियावर ट्रोल केले होते. यामुळे प्रियांकाच्या नावाची चर्चा रंगली होती. नुकताच सोशल मीडियावर तिचे काही फोटो आणि तिचे मीम्स चांगलेच व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये देशी गर्ल वेगळ्याच अंदाजात बघायला मिळाली. तिचा हा अंदाज म्हणजे प्रियांका खाकी रंगाच्या हाफ पॅंटमध्ये दिसत असल्याने तिच्या या फोटोला चांगलीच पसंती मिळत आहे.

लंडनमधील मादाम तुसाद संग्रहालयात बॉलिवूड तसेच हॉलिवूड अभिनेत्री असणाऱ्या प्रियांकाच्या मेणाच्‍या पुतळ्‍याचे अनावरण केले. नुकताच तिने आपल्या आईचा वाढदिवस साजरा केला. कुठलाही कार्यक्रम असो नेटिझन्‍सची तिच्‍या ड्रेसवर, फॅशनवर नजर असतेच.

असे आहेत व्हायरल होणारे मीम्‍स

RSS चा पोशाख खाकी रंगाची हाफ पॅंट आणि पांढऱ्या रंगाचा शर्ट असल्याने प्रियांकावर चांगलाच निशाणा साधत तिच्या फोटोला पसंत करत काही युजर्सने ट्रोल केले आहे. तिचे हे फोटो शेअर करत ट्रोलर्सने त्यावर कमेंट करत आताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) ची महत्वपुर्ण मिटींग संपवून बाहेर पडली आहे, असे मीम्स तयार करून सोशल मीडियावर तिच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here