पाहा देसी गर्लचा नव्या चित्रपटातील फर्स्ट लूक

priyanka chopra jonas shares first look of netflix original w can be heroes set
पाहा देसी गर्लचा नव्या चित्रपटातील फर्स्ट लूक

बॉलिवूड देसी गर्ल प्रियांका चोप्राने आपल्या नव्या चित्रपटाचा ‘वी कॅन बी हिरोज’ फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. प्रियांका चोप्रा एका वेगळ्या अंदाजात या चित्रपटात दिसणार आहे. प्रियांका चोप्राने या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करून हा चित्रपट लहान मुलांचा आहे हे सांगितले आहे.

प्रियांका चोप्रा ‘वी कॅन बी हिरोज’ हा चित्रपट नव्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रॉबर्ट रॉड्रिग्ज यांनी केलं आहे. हा लहान मुलांचा सुपरहिरो सारखा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक रॉबर्ट रॉड्रिग्ज स्पाय किड्स सीरिज, द अ‍ॅडव्हेंचर ऑफ शार्कबॉय आणि लावागर्लसाठी चांगले ओळखले जातात.

 सध्या या दिवसात प्रियांका चोप्रा हॉलिवूडच्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. Acting सोबत ती चित्रपटाची निर्मिती देखील करत आहे. नेटफ्लिक्सचा चित्रपट ‘द व्हाइट टायगर’चा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आहे. ज्यामध्ये प्रियांका Acting सोबत साहाय्यक निर्मितीची जबाबदारी पार पाडत आहे. अरविंद अडिगा यांच्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. प्रियांकाने ट्रेलर शेअर करत सांगितले की, ‘हा चित्रपट निवडक थिएटर्समध्ये डिसेंबरमध्ये प्रदर्शित होईल आणि २२ जानेवारीला नेटफ्लिक्सवर येईल.’