घरमनोरंजनया कारणामुळे प्रियांकाने केली निकची निवड

या कारणामुळे प्रियांकाने केली निकची निवड

Subscribe

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने लग्नासाठी निक जोनची निवड का केली याचे उत्तर दिले आहे. सध्या तिची लग्नाची तयारी सुरु असून डिसेंबरमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि पॉप सिंगर निक जोन डिसेंबर महिन्यात लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. मात्र या देसी गर्लला हा विदेशी मुलगा कसा काय भावला याचा प्रश्न अनेकांना पडला होता. त्याचे उत्तर स्वतः प्रियांकानेच दिले आहे. निक हा प्रियांकापेक्षा तब्बल १० वर्षांनी लहान आहे. त्यामुळे प्रियांकाने त्याचीच निवड का केली, असा सवाल वारंवार होत होता. मात्र त्यांच्या शंकेच निरसर आता प्रियांकानेच केले आहे. न्यूयॉर्कमध्ये प्रीवेडिंग पार्टी पार पडल्यानंतर प्रियांकाने एका कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली असता, आपण निकच्या प्रेमात का पडलो याचे उत्तर दिले आहे. तसेच जोडीदाराची निवड करताना महिलांनी कोणत्या गोष्टींचा विचार करावा याचे टीप्सही तिने यावेळी दिले आहेत.

वाचा : निकनं प्रियांकाला दिलं ‘हे’ गिफ्ट

- Advertisement -

नेमक काय म्हणाली प्रियांका

प्रियांका चोप्र म्हणाली की, ‘जो व्यक्ती तुमचा आदर करेल अशाच व्यक्तीची निवड आपण केली पाहिजे. याचा अर्थ त्यानं कॉफीचा आयता कप तुमच्या समोर ठेवला पाहिजे, असा होत नाही. तुम्ही आयुष्यात एखाद्याच्या गोष्टींवर खूप मेहनत घेता त्या मेहनतीचा त्यानं आदर केला पाहिजे. ती व्यक्ती या सर्व गोष्टींचा आदर करत असेल तरच त्याची निवड करा. माझ्याबाबतीत म्हणायचं तर मी अशाच पद्धतीनं विचार करते’. प्रियांका आणि निक हे दोघंही २०१७ पासून एकमेकांना डेट करत आहे.

वाचा : अखेर प्रियांका-निकच्या लग्नाची तारीख ठरली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -