Thursday, January 14, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन प्रियंका चोप्राला व्हायचयं तब्बल अकरा मुलांची आई !

प्रियंका चोप्राला व्हायचयं तब्बल अकरा मुलांची आई !

'द व्हाइट टाइगर' या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानही प्रियंकाला फॉमिली प्लॅनिंगवर प्रश्न विचारण्यात आले.

Related Story

- Advertisement -

हॉलिवूडपासून ते बॉलिवूडपर्यंत अभिनेत्री प्रियंका चोप्रा बोलबाला आहे. नेहमी हटके अंदाज झळकणारी प्रियंका पती निक जोनससह असलेल्या नात्याबद्दल व्यक्त होत असते. परंतु आता प्रियंकाला लग्नाच्या दोन वर्षानंतर फॉमिली प्लॅनिंगवर प्रश्न विचारले जात आहेत. अशातच ‘द व्हाइट टाइगर’ या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानही प्रियंकाला फॉमिली प्लॅनिंगवर प्रश्न विचारण्यात आले. यावर प्रियंकाने आई होण्याच्या इच्छेवर आपले मत व्यक्त केले आहे. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. प्रियंकाने एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत ११ मुलांची आई होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. प्रियंका म्हणाली, मला नेहमीच मोठे कुटुंब आवडते. आणि त्यातील लहान मुले अधिक आवडतात. मलाही जितकी होतील तेवढी मुले हवी आहेत. मला क्रिकेट टीम बनावयची आहे. हे बोलतानाचं पुढे हसत म्हणाली, ११ मुलं थोडी जास्त होतील. मी याबाबत नक्की सांगू शकत नाही. त्यामुळे सध्या तरी मला फॉमिली प्लानिंगबद्दल दबाव टाकू नका आणि माझ्या आगामी चित्रपटावर लक्ष ठेवा. नक्कीच 11 मुलांबद्दल ती विनोदात म्हणाली होती. यादरम्यान प्रियंका पती निक जोनससोबत नात्यातील अनेक खासगी गोष्टीही आपल्या चाहत्यांना शेअर करत असते.

भारताची मिस वर्ल्ड ठरलेली प्रियंका आगामी ‘द व्हाइट टायगर’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. त्यासोबतचं या चित्रपटात ती अवा दूवेर्नेसह सहाय्यक निर्मातीची भूमिका देखील निभावत आहे. या चित्रपटात भरपूर ड्रामा पाहयला मिळणार असून ज्यात एका ड्रायव्हर बलरामची कथा सांगण्यात आली आहे. यातील ड्रायव्हर बलराम हलवाईची भूमिका आदर्श गौरव साकारणार आहे. या चित्रपटाची कथा अरविंद अदिगा यांच्या ‘द व्हाइट टायगर’ या पुस्तकावर आधारित आहे. यात अभिनेता राजकुमार राव देखील झळकणार आहे.

- Advertisement -