घरमनोरंजनप्रियांका आणि नीकची 'रब ने बना दी जोडी'

प्रियांका आणि नीकची ‘रब ने बना दी जोडी’

Subscribe

प्रियांका आणि नीकच्या जोडीची नेटीझन्सनी कितीही खिल्ली उडवली असली तरी त्यांची जोडीही स्वर्गातच बनली असल्याचे नीक जोनासच्या भावाने म्हटले आहे. जोई जोनासने दिलेल्या एका मुलाखतीत वहिनी प्रियांका हिची प्रशंसा करत त्यांची जोडी ही ‘रब ने बना दी जोडी’ असल्याचे म्हटले आहे. लग्न समारंभानंतर न्यूयॉर्कमध्ये परतलेल्या जोईला पेनी इव्हेंट दरम्यान नव्या जोडप्याबद्दल विचारले असता काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

इन्स्टावर जोईने व्यक्त केली भावना

प्रियांका आणि नीकचे लग्न २ डिसेंबर रोजी जोधपूरमध्ये झाले. पण त्या आधी त्यांचे ख्रिश्चनपद्धतीने लग्न करण्यात आले. त्यावेळी तिच्या व्हेडिंग गाऊनमधील व्हिडिओ शेअर करत त्याने ‘Super Married! I Love You Both! Welcome to the Family Pri! Congratulations! My face hurts from all the smiling this week.’ अशी प्रतिक्रिया देखील दिली आहे. या शिवाय त्याने त्याच्या भावंडासोबतचा फोटो देखील शेअर करत नीकच्या लग्नामुळे आनंदी झाल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

 

View this post on Instagram

 

This was truly magical. @priyankachopra Link in bio @people

A post shared by Nick Jonas (@nickjonas) on

- Advertisement -

लग्नात केली धम्माल

नीकचे संपूर्ण कुटुंब भारतीय पद्धतीच्या विवाहासाठी भारतात आले होते. जोधपूरमध्ये झालेल्या या विवाहसोहळ्याला जोईसोबत त्याची होणारी बायको सोफी टर्नरसोबत आला होता. पहिल्यांदाच भारतीय पद्धतीचा विवाहसोहळा पाहिला त्याचा आनंद लुटला फार धम्माल आली. या सोहळ्यादरम्यान इतका हसलो आहे की, आता माझे गाल दुखू लागले आहेत असे देखील तो म्हणाला आहे.

 

View this post on Instagram

 

Bros

A post shared by J O E J O N A S (@joejonas) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -