घरमनोरंजनप्रियांका-निकचाही होणार दोनदा रिसेप्शन सोहळा

प्रियांका-निकचाही होणार दोनदा रिसेप्शन सोहळा

Subscribe

प्रियांका आणि निकदेखील दोन रिसेप्शन देणार असून एक मुंबईत तर दुसरे दिल्लीत होणार असल्याचे सांगितले जात आहे.

देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास २ डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. ३० नोव्हेंबरपासून त्यांच्या लग्न सोहळ्याला सुरुवात होणार आहे. नुकतेच इटलीमध्ये दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचा शाही विवाहसोहळा पार पडला असून त्यांचा एक रिसेप्शन सोहळा बंगळुरुमध्ये पार पडला असून २८ तारखेला दुसरा सोहळा मुंबईत होणार आहे. आता प्रियांका आणि निकदेखील दोन रिसेप्शन देणार असल्याचे समोर येत आहे. एक मुंबईत तर दुसरे दिल्लीत रिसेप्शन होणार असल्याचे सांगितले जात आहे.

वाचा : प्रियांका – नीकच्या फोटोवर त्याच्या आईची भावूक कमेन्ट

- Advertisement -

वाचा : प्रियांका-निक दीपवीर प्रमाणे करणार दोन पद्धतीने लग्न

वाचा : प्रियांकाचा होणारा पती निक जोनास आहे मधुमेहग्रस्त!

- Advertisement -

२९ पासून लग्न समारंभाला सुरुवात 

प्रियांकासोबतच्या लग्नासाठी निक भारतात दाखल झाला असून राजस्थानच्या जोधपुरमधील उमेद भवन येथे यांचा शाही विवाह सोहळा संपन्न होणार आहे. त्यांचे लग्न हिंदू आणि ख्रिश्चन असे दोन्ही पद्धतीने होणार असून त्यांच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळादेखील ग्रँड असणार असल्याचे सांगितले जात आहे. पहिला रिसेप्शन सोहळा मुंबईत सिनेसृष्टीतील मित्रमंडळींसाठी देणार असून दुसरा सोहळा हा दिल्लीत पार पडणार आहे. बॉम्बे टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, २९ नोव्हेंबर रोजी मेहंदी आणि संगीत समारंभ होणार असून ३० तारखेला कॉकटेल पार्टी दिली जाणार आहे. तर १ डिसेंबर रोजी हळद आणि २ तारखेला दोघांचं लग्न असा कार्यक्रम असणार आहे. आधी हिंदू पद्धतीने लग्न सोहळा होणार असून ३ डिसेंबर रोजी ख्रिश्चन पद्धतीने दोघं लग्न करणार आहेत. दोन्ही लग्न पद्धती एकाच सभागृहात होणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -