जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्याने केलेल्या कारवाईत ४० हून अधिक जवानांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या घटनेनंतर देशभरातून शहीद जवानांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी अनेक बॉलिवूडकर पुढे आले आहेत. अभिनेता अक्षय कुमार शहीदांच्या कुटुंबियांना ५ कोटी रुपयांची मदत करणार आहे.
#Pulwama is something we cannot & will not forget.We’re all angry & it’s time to act. So act now,donate to the martyrs of Pulwama on https://t.co/5j0vxsSt7f There’s no better way to pay homage to them & show your support.This is the only official site,pls don’t fall prey to fakes pic.twitter.com/sYruUtzgKY
— Akshay Kumar (@akshaykumar) February 16, 2019
बिग बी देखील जवानांच्या मदतीला धावले
बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमारने हल्ल्यानंतर ‘भारत के वीर’ या वेबसाइच्या माध्यमातून शहिदांच्या कुटुंबियांना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर हजारो हात मदतीसाठी पुढे सरसावले असून गेल्या ३६ तासांत या वेबसाइच्या माध्यमातून सात कोटींचा निधी जमा झाला आहे. या जमलेल्या रक्कमेत अक्षय स्वत: पाच कोटी रुपयांचे योगदान देणार आहे. तर बिग बी देखील जवानांच्या मदतीला धावून आले आहेत. बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तर ‘उरी’ चित्रपटाच्या टीमने एक कोटी रुपये दिले आहेत.
हेही वाचा – Pulwama Terror Attack – हा मार्ग जवानांसाठी ठरतोय ‘धोकादायक’
हेही वाचा – पुलवामा हल्ल्यानंतर आदिलच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया