घरमनोरंजनसलमानच्या रेस ३ च्या दुसऱ्या गाण्याचा टीझर रिलीज

सलमानच्या रेस ३ च्या दुसऱ्या गाण्याचा टीझर रिलीज

Subscribe

सलमान खानच्या रेस ३ ‘हिरिये’ हे गाणं नुकतंच रिलीज करण्यात आलं होतं. आज रेस ३ च्या सेल्फीश या गाण्याचा टीझर रिलीजी झाला असून हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंडिंग होत आहे. प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा यांचा बहुप्रतिक्षित ‘रेस ३’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये एकापेक्षा एक असे सरस कलाकार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून सलमान खान परत एकदा प्रेक्षकांची मन जिंकण्यासाठी तयार झाला आहे.

सलमान खान, जॅकलिन फर्नांडिस आणि बॉबी देओल प्रेमाचा त्रिकोण

- Advertisement -

सलमान खान, जॅकलिन फर्नांडिस आणि बॉबी देओल यांच्यातील प्रेमाचा त्रिकोण या गाण्यातून दिसून येतोय. सेल्फिशच्या २० सेकंदाच्या टीझरमध्ये जॅकलिन बॉबी आणि सलमान दोघांबरोबरही रोमान्स करताना दिसत आहे. हे संपूर्ण गाणं लवकरच रिलीज करण्यात येईल. विशाल मिश्रा यांनी या गाण्याला संगीत दिले असून पाकिस्तानी गायक आतिफ अस्लम आणि सलमानची कथित गर्लफ्रेंड लुलिया वंतूर यांनी हे गाणं गायलं आहे. रेस – ३ या चित्रपटात सलमान आणि जॅकलिनबरोबरच अनिल कपूर, बॉबी देओल, डेझी शाह, साकीब सलीम अशी तगडी स्टारकास्ट आहे.

दरम्यान, ‘रेस ३’ चित्रपटाचा नुकताच प्रदर्शित झालेला ट्रेलर काही प्रेक्षकांनी उचलून धरला तर काही प्रेक्षकांनी टीका केली असून त्यावर बरेच मीम्सदेखील करण्यात आले आहेत. तरीही सध्या रेस – ३ ला सर्वात जास्त व्ह्यू मिळाले आहेत. त्यामुळे सेल्फिश या गाण्याला किती व्ह्यूज मिळतील याकडेदेखील युजर्सचे लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -