घरCORONA UPDATEअभिनेत्री रेचल कोरोना पॉझिटिव्ह; ट्विटरवर केली भावूक पोस्ट शेअर

अभिनेत्री रेचल कोरोना पॉझिटिव्ह; ट्विटरवर केली भावूक पोस्ट शेअर

Subscribe

कोरोनाचा विखळा आता सेलिब्रिटींनाही पडू लागला आहे. अभिनेत्री रेचल व्हाईट हिला कोरोनाची लागण झाली असून तिने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती चाहत्यांना दिली आहे. रेचलने एक भावूक पोस्ट लिहून म्हटले आहे की, मी कोरोना पॉझिटिव्ह आहे. घरामध्येच क्वारंटाईन आहे. तुमच्या प्रार्थनेमध्ये माझाही समावेश करा, मला कोरोनातून मुक्त होण्यासाठी तुमच्या प्रार्थनेची गरज आहे. एका सोशल मीडियावरील युजरने रेचलला काळजी घेण्यास सांगितले आहे. तसेच तुम्ही लवकर बरे व्हाल, अशा सदिच्छाही दिल्या आहेत. तर आणखी एका युजरने, लवकर ठीक व्हा. योग्य काळजी घ्या, असे लिहिले आहे. रेचल व्हाईट यांनी उंगली आणि हर हर ब्योमकेश चित्रपटामध्ये भूमिका साकारल्या आहेत.

- Advertisement -

बॉलीवूडमधील इतरही कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. नुकतेच महानायक अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबियातील सदस्यांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन व त्यांची मुलगी आराध्या हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. तर अभिनेत्री अनुपम खेर यांच्याही आई व भावाच्या कुटुंबाला कोरोनाची लागण झाल्याचे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले. त्यामुळे आता सेलिब्रिटींमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे यातून दिसून येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

मुंबईत ४ हजार आरोग्य सेविकांचे आरोग्य धोक्यात!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -