घरमनोरंजनबदलापूर मधील त्या सीननंतर मला 'तसे' रोल ऑफर झाले!

बदलापूर मधील त्या सीननंतर मला ‘तसे’ रोल ऑफर झाले!

Subscribe

नुकतीच राधिकाने बरखा दत्तच्या वुमन या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी राधिकाने अनेक गोष्टींचा खुलासा केला.

अभिनेत्री राधिका आपटेला बदलापूर चित्रपटादरम्यान व्हायरल झालेल्या न्यूड सीन नंतर सेक्स कॉमेडीच्या अनेक ऑफर येऊ लागल्या आहेत. राधिका आपटेचा न्यूड सीन व्हायरल होण्याची ही काही पहिलीच वेळ नवह्ती. राधिका अश्या बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे जीने आत्तापर्यंत अनेक चित्रपटात बोल्ड सीन दिले आहेत. त्यामुळे ती सोशलमिडीयावरही अनेकदा चर्चेत राहीली आहे.

View this post on Instagram

? @ishaannair7 @taniafadte @g.luca_makeup

A post shared by Radhika (@radhikaofficial) on

- Advertisement -

नुकतीच राधिकाने बरखा दत्तच्या वुमन या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी राधिकाने अनेक गोष्टींचा खुलासा केला. यावेळी ती आपल्या फिल्मी करियरबद्दल भरभरून बोलली आणि आपल्या आयुष्याबद्दल अनेक खुलासेही केले. यावेळी बदलापूर चित्रपटादरम्यान व्हायरल झालेल्या न्यूड सीन बद्दल विचारले असता राधिका म्हणाली, माझा न्यूड सीन व्हायरल झाल्यानंतर अनेकांना वाटले मी त्याच प्रकारच्या भुमिका करते. या चित्रपटानंतर मला अनेक सेक्स कॉमेडीच्या ऑफर येऊ लागल्या.

- Advertisement -

पुढे राधिका म्हणाली, तुम्ही ऐकून हैराण व्हाल की जेव्हा मी बदलापूर हा चित्रपट करत होते. त्यावेळी एकजण माझ्यावर बलात्कार करून मारण्यास इच्छित होता. या सीन नंतर सेक्स कॉमेडी फिल्मच्या ऑफर येऊ लागल्या. याला कारणीभूत माझी अहिल्या ही शॉर्ट फिल्म ठरली. ज्या शॉर्ट फिल्ममध्ये मी न्यूड सीन दिले होते. यानंतर मला केवळ असाच प्रकारच्या भुमिका ऑफर झाल्या. मी कधीही प्रेक्षकांना विचारलं तुम्ही माझ्या भुमिका बघितल्या आहेत का तर केवळ बदलापूर आणि अहिल्याचं नाव प्रेक्षक घेतात.

लवकरच राधिका दिग्दर्शकाच्या भुमिकेतून आपल्यासमोर येणार आहे. स्लीपवॉकर्स अस या शॉर्ट फिल्मचं नाव आहे. या शॉर्ट फिल्मचा कालावधी ३० मिनीट आहे. नुकतेच या चित्रपटाचे शुटींग पुर्ण झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -