Sunday, January 24, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन शिल्पाचे 'अहो' आता दिग्दर्शन क्षेत्रातही

शिल्पाचे ‘अहो’ आता दिग्दर्शन क्षेत्रातही

म्युझिक व्हिडीओमध्ये काम केल्यानंतर आता व्यावसायिक आणि शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा प्रथमच दिग्दर्शनाकडे वळत आहेत. राज यांनी राहत फतेह अली खान यांच्या आगामी 'तेरी याद' या म्युझिक व्हिडीओचे दिग्दर्शन केले आहे.

Related Story

- Advertisement -

म्युझिक व्हिडीओमध्ये काम केल्यानंतर आता व्यावसायिक आणि शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा प्रथमच दिग्दर्शनाकडे वळत आहेत. राज यांनी राहत फतेह अली खान यांच्या आगामी ‘तेरी याद’ या म्युझिक व्हिडीओचे दिग्दर्शन केले आहे. या व्हिडीओमध्ये टीव्ही अभिनेत्री अनिता हसनंदानी आणि तिचे पती रोहित रेड्डी दिसणार आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमधील काही भाग या शिल्पा आणि राज यांच्या खऱ्या आयुष्यातील प्रेमकहाणीवर आधारित आहे. रोहित मूळचा अभिनेता नसल्याने आणि त्यात डान्स करायचे नाही असे ठरवल्याने सुरुवातीला तो या व्हिडीओत काम करण्याबाबत साशंक असल्याचे राज सांगतात. तर यावेळी राजने ‘तुला फक्त लव्हबर्ड बनायचे आहे. ते तर तू खऱ्या आयुष्यात आहेसच’, असे सांगत रोहितला मनवल्याचे हसत हसत सांगितले.

वाचा – ‘या’ कारणामुळे शिल्पा शेट्टी आणि कुटुंबीयांना खेचले कोर्टात

व्हिडीओ व्हॅलेन्टाईन्स डेला होणार लाँच 

- Advertisement -

राज यांनी मंज मुसिक आणि सुमित मेहरा यांसोबत मिळून स्वतःचे मुझिक वन रेकॉर्डस् या म्युझिक लेबलची स्थापना केली आहे. ‘गेट डर्टी’ या चार्टबस्टरनंतर हेच लेबल ‘तेरी याद’चे लाँच करण्यासाठी सज्ज आहे. हे गाणं सनी ब्राऊन यांनी शब्द आणि संगीतबद्धही केले आहे. राज आणि रॉबिन बेहल यांनी मिळून दिग्दर्शीत केलेला हा व्हिडीओ १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेन्टाईन्स डेला लाँच होणार आहे.

वाचा – २४ कॅरेट सोन्याचं आईस्क्रीम; शिल्पाने घेतला आस्वाद

भविष्यात सिनेदिग्दर्शनही करणार

- Advertisement -

सध्या भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी असल्याने या गाण्याचे रेकॉर्डिंग परदेशात करण्यात आले आहे. आता भविष्यात राजला सिनेदिग्दर्शनात उडी घ्यायची इच्छा आहे का विचारल्यावर ते सांगतात, ‘एक व्हिडीओ करून मला दिग्दर्शनाचे काम किती अवघड आहे हे समजले आहे. आता दिग्दर्शकांप्रती असलेला माझा आदर अधिक वाढला आहे. यातून मी खूप शिकलो आहे. माझ्या बकेट लिस्टमधून या एका गोष्टीवर फुलीही मारता आली. मात्र आता मी पुढे हे काम करेन की नाही हे आता सांगता येणे अवघड आहे.’

- Advertisement -