घरमनोरंजन'काला'च्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

‘काला’च्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Subscribe

सुपरस्टार रजनिकांत यांच्या आगामी काला चित्रपटाला प्रदर्शित होण्यापूर्वीच अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कर्नाटकमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यात आला आहे. तर दुसरीकडे धारावीचे एकेकाळचे साखर व्यापारी तिराविअम यांचा मुलगा जवाहर नाडर यांनी १०१ कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. मात्र आता या चित्रपट प्रदर्शनाचे सर्व ेमार्ग मोकळे झाले आहेत. कारण काला चित्रपट प्रदर्शनाला स्थगिती देण्यास सुप्रिम कोर्टाने नकार दिला आहे.

‘काला’ कर्नाटकात प्रदर्शित होणार

दरम्यान रजनीकांतच्या काला चित्रपट प्रदर्शनाला स्थगिती देण्यास सुप्रिम कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे काला चित्रपट कर्नाटकात प्रदर्शित होणार आहे. रजनिकांत यांनी कावेरी नदीसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे काला चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. मात्र आता सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानंतर काला चित्रपट प्रदर्शनाला आलेल्या अडचणी दूर झाल्या आहेत. लोकांची उत्सुकता पाहता चित्रपटाला अशी स्थगिती देणे योग्य नसल्याचे स्पष्टीकरण कोर्टाने दिलं आहे.

- Advertisement -

सरकारने थिएटर आणि प्रेक्षकांना संरक्षण द्यावे

रजनीकांत म्हणाले की, काला चित्रपटावरुन कर्नाटकात कोणत्याही मुद्द्यावरुन वाद होणार नाही, असं मला वाटतं. कर्नाटकात फक्त तमिळच नाही तर इतर भाषा बोलणारे लोकही राहतात त्यांनी हा चित्रपट पाहण्याची इच्छा वर्तवली आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की, कर्नाटक सरकार थिएटर आणि प्रेक्षकांना संरक्षण देतील, असं रजनीकांत यांनी चेन्नईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलंय.

- Advertisement -

कर्नाटकात चित्रपट प्रदर्शनाला विरोध का?

कावेरी पाणी प्रश्नावर रजनीकांत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर कर्नाटकात चित्रपट प्रदर्शनाला विरोध करण्यात आला. कावेरी नदीतून तामिळनाडूला मिळणाऱ्या पाण्याची क्षमता कमी करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश निराशाजनक आहे. राज्य सरकारने यासंदर्भात याचिका दाखल करावी, असं रजनीकांत यांनी म्हटलं होते. या वक्तव्यानंतर कर्नाटकातील चित्रपट संघटनांनी काला चित्रपट प्रदर्शनाला विरोध केला. या चित्रपट प्रदर्शनाच्या विरोधावरुन आता रजनीकांचे देश-विदेशातील चाहत्यांनी सोशल मीडियावरुन या निर्णयाचा विरोध केला आहे.

रजनिकांत यांच्यावर अब्रुनुकसानिचा दावा

रजनीकांत यांचा काला चित्रपट एस. तिराविअम यांच्या जीवनावर आधारित आहे. तिराविअम यांचा मुलगा जवाहर नाडर यांनी रजिनकांत यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे. काला चित्रपटातून त्यांच्या वडिलांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा आरोप जवाहर नाडर यांनी केलाय. तिराविअम १९५७ साली मुंबईतल्या धारावीमध्ये आले. त्याठिकाणी ते ‘गुडवाला सेठ’ आणि ‘कालासेठ’ या नावाने ओळखले जायचे. तिराविअम यांचे समाजात चांगले स्थान होते. त्यांनी कोणतेही बेकायदेशीर कामं केली नसल्याचे जवाहर यांनी म्हटलं. मात्र हा चित्रपट तिराविअम यांच्या जीवनावर आधारित नसल्याचे काला चित्रपटाच्या टीमने स्पष्ट केलं आहे.

काला चित्रपटातून दोन समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न

रजनीकांत यांनी काला चित्रपट राजकीय कारण नजरेत ठेवून काढला असल्याचा आरोप नाडर यांनी केलाय. समाजातील दोन वर्गांमध्ये फूट पाडण्यासाठी या चित्रपटाचे नाव काला करिकालन ठेवण्यात आले असल्याचे देखील त्यांनी म्हटलंय. रजनीकांत यांनी लिखित स्वरुपात माफीनामा द्यावा, असं या अब्रुनुकसानिच्या दाव्यात म्हटलं आहे. नाडर यांच्या वडीलांनी समाजकार्य केलं आहे. त्यांनी मागासवर्गियांच्या हितासाठी काम केलं आहे, असे असताना देखील काला चित्रपटातून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे काम केलं गेलं असल्यामुळे या चित्रपटाला विरोध केला असल्याचे नाडर यांनी म्हटलं आहे.

 

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -