घरमनोरंजनसौदर्या रजनीकांत दुसऱ्यांदा चढणार बोहोल्यावर

सौदर्या रजनीकांत दुसऱ्यांदा चढणार बोहोल्यावर

Subscribe

रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या लवकरच पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकणार आहे. सौंदर्याचे लग्न उद्योगपती आणि अभिनेता विशनगन वनानगामुडी याच्या सोबत चैन्नई येथे होणार आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची दुसरी मुलगी सौंदर्या लवकरच दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकणार आहे. ११ फेब्रुवारी २०१९ रोजी तिचा विवाह होणार असल्याचे माहिती समोर आली आहे. सौंदर्याचा विवाह चैन्नई येथे होणार आहे. सौंदर्याचा विवाह उद्योगपती आणि अभिनेता विशनगन वनानगामुडी याच्यासोबत होणार आहे. सौंदर्या आपली आई लता रजनीकांतसोबत तिरूपती मंदिरात दर्शनासाठी गेली होती. लग्नापूर्वी  तिरूपतीमंदीरात तिने एक विशेष पूजा केली. सौंदर्या आणि विशागन यांचा साखरपूडा नुकताच पार पडला. या कार्यक्रमात फक्त कुटुंबीय आणि जवळचे लोक उपस्थित होते.

- Advertisement -

सौंदर्याला पाच वर्षाचा मुलगा

सौंदर्याचे पहिले लग्न एका मासिकाचे संपादक कनिखा कुमारन याच्याशी २०१० मध्ये झाले होते. लग्नाच्या काही वर्षांनंतर हे दोघे विभक्त झाले होते. सौंदर्याला पाच वर्षाचा मुलगा आहे. मागीलवर्षी सौंदर्याला घटस्फोट झाला. रजनीकांत यांनी मुलीचे लग्न वाचवण्याचा प्रयत्न केला होता मात्र सौदर्याचा घटस्फोट झाला होता.

- Advertisement -

९ फेब्रुवारी पासून सुरु होणार कार्यक्रम

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार सौंदर्याचे लग्न ११ फ्रेबुवारी रोजी होणार आहे. मात्र या लग्नाच्या कार्यक्रमाची सुरुवात ९ फेब्रुवारी रोजीपासून सुरु होणार आहे. सध्या दोन्ही कुटुंबीय लग्नाची तयारी सुरु केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -