घरमनोरंजनमीटूमध्ये अडकलेल्या राजू हिरानींच्या नॉमिनेशनला नेटिझन्सचा विरोध

मीटूमध्ये अडकलेल्या राजू हिरानींच्या नॉमिनेशनला नेटिझन्सचा विरोध

Subscribe

संजू चित्रपटासाठी राजकुमार हिराणी यांना दोन नॉमिनेशन मिळाले आहेत. फिल्मफेअर 2019 ची नुकतीच घोषणा करण्य़ात आली. यावेळी राजकुमार हिराणी यांना २ नॉमिनेशन मिळाल्य़ामुळे नेटकऱ्यांनी याचा समाचार घेतला

२०१८ मध्ये संजू चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्यावर महिला क्रू मेंबरने लैंगिक छळाचा अरोप केला होता. संजय दत्तच्या या बायोपिकमध्ये रणबीर कपूर मुख्य भुमिकेत आहे. या चित्रपटासाठी राजकुमार हिराणी यांना दोन नॉमिनेशन मिळाले आहेत. फिल्मफेअर 2019 ची नुकतीच घोषणा करण्य़ात आली. यावेळी राजकुमार हिराणी यांना २ नॉमिनेशन मिळाल्य़ामुळे नेटकऱ्यांनी याचा समाचार घेतला

राजकुमार हिराणी यांना संजू चित्रपटासाठी दोन नॉमेनेशन मिळाले, आम्हाला आशा आहे की त्यांना हा पुरस्कार दिला जाणार नाही. कारण त्यांच्यावर लौंगिक छळाचा आरोप करण्यात आला आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

 

२९ जूनला संजू प्रेक्षकांच्या भेटीला आला. संजूने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. संजूने पहिल्याच आठवड्यात १२०.०६ इतकी कमाई केली. आतापर्यंत एवढी कमाई करणारा संजू हा पाचवा चित्रपट ठरला आहे. राजकुमार हिराणी यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. रणबीर कपूर बरोबर संजय दत्त,मनीषा कोइराला,परेश रावळ,दीया मिर्झा,सोनम कपूर,विकी कौशल,जिम सारभ आणि अनुष्का शर्मा यांच्या मुख्य भुमिकेत होत्या.

‘६४वा विमल फिल्मफेअर पुरस्कार २०१९’ सोहळा यंदा बीकेसी येथील जिओ गार्डनमध्ये सिने तारे-तारकांच्या उपस्थितीत रंगणार आहे. ‘यंदा विमल फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात हिंदी चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कलाकारांचा यथोचित सन्मान केला जाणार आहे. २३ मार्चला हा सोहळा पार पडणार आहे. या पुरस्काराचे या वर्षीचे वैशिष्ट म्हणजे रणवीर सिंग या पुरस्कार सोहळ्याचा शो स्टॉपर असेल. मात्र फिल्मफेअरचे प्रायोजक विमल ही तंबाखू उत्पादन करणारी कंपनी असल्यामुळे फिल्मफेअर वादात सापडण्याची शक्यता आहे. याविरोधात अन्न आणि औषध प्रशासनाने फिल्मफेअरच्या मुख्यकार्यकारी आधिकारी यांना पत्राद्वारे विमल ला प्रायोजक असण्यावरून विचारले. शिवाय याचे योग्य स्पष्टीकरण न मिळाल्यास योग्य ती कारवाई करणार असल्याचेही सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -