घरमनोरंजनसवी सिध्दू यांच्या मदतीला धावले बॉलिवूडकर

सवी सिध्दू यांच्या मदतीला धावले बॉलिवूडकर

Subscribe

अभिनेते सवी सिध्दू हे सिक्युरीटी गाड ची नोकरी करत असल्याची बातमी झळकली, आणि बॉलिवूडकरांनी सवी सिध्दू यांना मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.

पटियाला हाऊस,गुलाम,बेवकूफियॉँ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करणारे अभिनेते सवी सिध्दू यांना मुंबईच्या मलाडमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून काम  करत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून फिरत असणाऱ्या या बातमीची दखल बॉलिवूड कलाकारांनी अखेर घेतली आहे आणि सवी सिध्दू यांच्या मदतीसाठी बॉलिवूडन त्यांच्यामागे उभे राहण्याची तयारी दर्शवली.

- Advertisement -

सवी सिद्धूंच्या मदतीसाठी राजकुमार राव सारखा अभिनेता पुढे आला आहे. तर दिग्दर्शक अनुराग कश्यपने या निमित्ताने बॉलिवूडमधील वास्तव यानिमित्ताने पुढे आणलं आहे. राजकुमार राव यांनी ट्विटरवर एक सवी सिध्दू यांच्यासाठी एक भावूक पोस्ट लिहिली आहे. राजकुमार राव यांनी ट्विटरवर लिहीले आहे की, सवी सिद्धू सर तुमची कथा खरोखरच प्रेरणादायी आहे. चित्रपटांतील तुमचे काम वाखाणण्याजोगे राहिले. तुमच्या सकारात्मक वृत्तीला सलाम. मी निश्चितपणे माझ्या कास्टिंग मित्रांना तुमची भेट घ्यायला सांगेल.’ असं राजकुमावर राव यांनी सांगितले.

- Advertisement -

 

सवी सिद्धू यांच्या निमित्ताने अनुराग कश्यप यांनी इंडस्ट्रीतील अनेक गोष्टी पुढे आणल्या आहेत. अनुराग कश्यप म्हणतात, चौकीदार असणे एक चांगले काम आहे. मी कोणतेही काम लहान- मोठे असे मानत नाही. चॅरिटी कोणत्याही कलेला किंवा कलाकाराला तगवू शकत नाही. सवी सिद्धू सारख्या अनेक कथा या इंडस्ट्रीत आहेत. मी अनेक कलाकारांना ओळखतो,ज्यांच्याकडे काम नाहीये. जर कलाकारांना जगवायचं असेल तर चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघा. यामुळे कलाकारांना काम मिळतील. सध्या इंडस्ट्रीमध्ये अनेकजण असे आहेत ज्यांच्याकडे काम नाहीयेत. मी देखील नवीन लोकांना काम दिले आहे देत राहणार आहे.

आणि सवी सिध्दू पडले एकटे

सध्या सवी सिद्धू एका हाऊसिंग सोसायटीत सिक्युरिटी गार्डचं काम करत आहेत. समी म्हणतात, मला काम मिळाले नाही म्हणून नाही तर उलट माझ्याकडे जास्त काम आसल्याने मी काही चित्रपटांना नकार देत होतो. पण माझी तब्येत दिवसेंदिवस ढासळत होती. त्यामुळे काम करणे माझ्यासाठी शक्य नव्हते. त्यात माझ्या पत्नीचे आई-वडिलांचे निधन झाले. त्यामुळे पैशाची चणचण निर्माण झाली. यासाठी मला सिक्युरीटी गार्डची नोकरी पत्करावी लागली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -