‘बधाई हो’ नंतर आता राजकुमार-भूमीचा ‘बधाई दो’; जानेवारीत सुरू होणार शुटिंग

जंगल पिक्चर्सनी 'बधाई दो' ची मोठी घोषणा केली असून या चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी जानेवारीत सुरू होणार

२०१८ मध्ये रिलीज झालेल्या बधाई हो या चित्रपटाने अनेक विक्रम मोडले. त्याच्या ऑफबीट कंटेंटपासून ते सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्सपर्यंत हा चित्रपट सुपरहिट ठरला. आता त्याच यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी, या चित्रपटाचा निर्माता बधाई होचा सिक्वल घेऊन येत आहेत. यावेळी चित्रपटाचे नाव ‘बधाई दो’ असे ठेवण्यात आले आहे. तर राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर हे स्टारकास्ट आहे. जंगल पिक्चर्सनी ‘बधाई दो’ ची मोठी घोषणा केली असून या चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी जानेवारीत सुरू होणार असल्याचे सांगितले.

दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल बधाई हो चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्याच्या सिक्वेलची घोषणा केली आहे. यापूर्वीही या चित्रपटाच्या सिक्वेलची चर्चा सुरू होती, पण आता निर्मात्यांनी चित्रपटाविषयी सविस्तरपणे सांगितले आहे. पहिल्या भागाप्रमाणे या वेळीही कथेवर लक्ष केंद्रित केले जाणार असून काहीतरी वेगळे दाखविण्यावर भर असणार आहे. बधाई होमध्ये राजकुमार राव प्रथमच पोलिस निरीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत, तर भूमी पीटी शिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. राजकुमार बधाई होबद्दल असे सांगतो की, मला आनंद होत आहे की गोष्टी वेगवान पूर्ववत होत आहे. आणि आयुष्य पुन्हा सुरू झाले आहे.

राजकुमारने असे ही सांगितले की, चित्रपट बधाई होपेक्षा हा सिक्वेल पूर्णपणे वेगळा ठऱणार आहे. बधाई हो हा एक विशेष चित्रपट असून संपूर्ण टीमने एक सुंदर चित्रपट बनविला होता जो सगळ्यांना खूप आवडला. आमचा चित्रपट आणि कथा बधाई होपेक्षा खूपच वेगळी आहे. तसे, भूमी आणि राजकुमारची जोडी पहिल्यांदाच या चित्रपटात दिसणार आहे. अशा परिस्थितीत दोघांच्या केमिस्ट्रीबद्दल चर्चा रंगली आहे.

तर भूमीने याबद्दल असे सांगितले की, राजकुमारबरोबर मी प्रथमच काम करत आहे, मी खूप उत्सुक आहे कारण आम्ही लवकरच आपले शूट सुरू करणार आहोत. ‘बधाई हो’ हा माझा आवडता चित्रपट ठरला आहे आणि मला त्याच्याच सिक्वेलमध्ये काम करायला मिळतंय याचा मला आनंद झाला आहे.


 कंगनाने दिले राज्य सरकारला उत्तर; म्हणाली, ‘मी लवकरच परत येईन’