घरमनोरंजनरजनीकांत आणि नवाजुद्दीन पहिल्यांदाच एकत्र

रजनीकांत आणि नवाजुद्दीन पहिल्यांदाच एकत्र

Subscribe

पहिल्यांदाच नवाजुद्दीन सिद्दीकी थलायवा रजनीकांतसह काम करणार असून प्रेक्षकांमध्येही या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. बॉलीवूडच्या तिन्ही खानबरोबर काम केल्यानंतर आता नवाजुद्दीला सुपरस्टारबरोबर काम करताना पाहता येणार आहे.

बॉलीवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयानं अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीनं ठसा उमटवला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आगामी सिनेमामध्ये नवाजुद्दीन सुपरस्टार रजनीकांत यांच्याबरोबर काम करणार आहे. सन पिक्चर्सनं ट्विट करून ही बातमी निश्चित केली आहे. पहिल्यांदाच नवाजुद्दीन सिद्दीकी थलायवा रजनीकांतसह काम करणार असून प्रेक्षकांमध्येही या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. बॉलीवूडच्या तिन्ही खानबरोबर काम केल्यानंतर आता नवाजुद्दीला सुपरस्टारबरोबर काम करताना पाहता येणार आहे. या चित्रपटात नवाजबरोबर सिमरन बग्गा ही अभिनेत्री असून महत्त्वाची भूमिका असल्याची बातमी आहे.

- Advertisement -

पहिल्यांदाच दिसणार तामिळ चित्रपटात

नवाजुद्दीन पहिल्यांदाच तामिळ भाषेतील चित्रपटात दिसणार आहे. कार्तिक सुब्बाराज या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला डेहरादूनमध्ये सुरुवात झाली असून सध्या रजनीकांत आणि सिमरन यांचं चित्रीकरण सुरु आहे. अजूनही नवाजुद्दीननं आपल्या चित्रीकरणाला सुरुवात केलेली नाही. सध्या नवाजुद्दीन हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बायोपिकमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या लुकसाठीदेखील त्यानं प्रचंड मेहनत घेतली आहे. तर, नवाजुद्दीन १९८३ मध्ये झालेल्या वर्ल्डकपसंदर्भात येणाऱ्या चित्रपटातदेखील काम करत असल्याची सध्या बातमी आहे. नवाजुद्दीननं आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिका बॉलीवूडमध्ये साकारल्या आहेत. त्यामुळं या चित्रपटात त्याची नक्की काय भूमिका असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. सन पिक्चर्स या चित्रपटाचे निर्माते असून अनिरुद्ध रविचंदरनं या चित्रपटाला संगीत दिलं आहे. तर, रजनीकांतसाठी एस. पी. बालासुब्रमण्यम यांनी गाणं गायलं असल्याची माहिती आहे. यापूर्वीदेखील या जोडीची गाणी सुपरहिट झाली आहेत. या चित्रपटात बॉबी सिमहा, सनथ रेड्डी आणि मेघा आकाश यांचीदेखील प्रमुख भूमिका असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -