…असं म्हणत राखीने नेटकऱ्यांना धमकावले!

राखी सावंतला बॉलिवूडमधील उत्कृष्ट आयटम डान्सरकरिता दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मात्र तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. यावर राखी भडकली असून आता मला ट्रोल केल तर बघाच, असे म्हणच नेटकऱ्यांना धमकावले आहे.

Mumbai
Rakhi Sawant
अभिनेत्री राखी सांवत

बॉलिवूड विश्वात आयटम डान्स करणारी तसेच वादग्रस्त विधानाकरिता नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री राखी सांवतला नुकतेच दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले. राखीला हा पुरस्कार Best Item Dancer करिता देण्यात आला आहे. हा पुरस्कार राखीला प्रदान केल्यानंतर काहींनी तिला शुभेच्छा दिल्यात तर काहींनी प्रश्न उपस्थित केले आहे. यासोबतच दादासाहेब फाळके हा पुरस्कार राखीला दिल्याने नेटीझन्सचा विश्वास बसत नाहीये. तसेच ‘राखी तू हा पुरस्कार विकत घेतलास का’, असा देखील नेटकऱ्यांनी राखीला विचारला आहे. यावर राखी चांगलीच भडकली असून तिने नेटकऱ्यांना धारेवर धरत सडेतोड उत्तर दिले आहे.

काय म्हणाली राखी

‘दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन पुरस्कारासाठी मी पात्र आहे. त्यामुळेच मला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मात्र जर मला आता कोणी ट्रोल केले तर आता याच पुरस्काराने एकेकाला मारेन’, असे राखीने म्हटले आहे.

राखी सावंतला बॉलिवूडमधील उत्कृष्ट आयटम डान्सरकरिता दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन पुरस्काराने सन्मानित केले. बॉलिवूडमधील आयटम डान्सर म्हणून तिचे स्वागत करत मलायका अरोराने देखील हा पुरस्कार राखीला मिळाल्याने तिला शुभेच्छा दिल्या. तसेच तिने राखी सावंत ही मुळातच बॉलिवूडची आयटम डान्सर असून हा पुरस्कार मिळवून राखीने सिद्ध केल्याचे मलायका म्हणाली.

राखीला मिळाला पहिला पुरस्कार

आतापर्यंत सर्व भाषेतील ७५-१०० आयटम सॉन्ग्स राखीने केले आहेत. तसेच बरेच रिअॅलिटी शो देखील केले आहेत. परंतु कोणताच पुरस्कार मिळाला नाही. मात्र आयटम डान्सकरिता सन्मानित केल्याबद्दलही राखी सावंतने देवाचे आभार मानले आहेत.