राखी सावंतचा पती रितेश,राखी विषयी म्हणतो….

Mumbai
rakhi sawant

आपल्या ड्राम्यांमुळे आणि सतत वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे राखी सावंत. काही दिवसांपासून राखी सतत चर्चेत असते ती म्हणजे तीच्या लग्नामुळे राखी सावंतने गुपचूप लग्न केले ही चर्चा गेले कित्येक दिवस रंगत आहे. मात्र या ड्रामा क्विनच्या लग्नावर कोणाचाही विश्वास नव्हता. आता राखीने खरोखर लग्न केले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राखीने एका एनआरआयशी लग्न केले आहे. मात्र अद्याप राखीने त्याला मिडीयासमोर आणले नाही. त्यामुळे त्याचा चेहरा कोणी बघितलेला नाही. पण राखीचा नवरा रितेशने एका वेबसाईटला मुलाखत देत लग्नांच्या बातम्यांवर शिक्का मोर्तब केलं.

View this post on Instagram

Konsa Mera husband hai

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

या मुलाखतीत रितेश म्हणाला,‘राखीचे कॅमेरा समोरचे वागणे कसे ही असो मला ती मनापासून आवडते. ती एक व्यक्ती म्हणून खूप चांगली आहे. राखी सारखी पत्नी मिळाल्यामुळे मी स्वत:ला नशीबवान समजतो. राखी ही माझ्यासाठी देवाने दिलेली एक भेट आहे. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात तिच्यासारखी महिला पाहिली नाही’

रितेशला मीडियापासून दूर राहण्याबाबत काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर रितेशने तो इतके दिवस मीडियापासून दूर का राहिला याचे स्पष्टीकरण दिले, ‘मी मीडियासमोर का यावे? त्यातून काय साध्य होणार आहे का? उगाच नको त्या चर्चा सुरु होतील. मला माझे खाजगी आयुष्य मीडियासमोर मांडायला आवडत नाही. माझ्याबद्दल लोक काय विचार करतात त्याने मला काडीमात्र फरक पडत नाही. माझे कुटुंबीय आणि राखीचे कुटुंबीय खूप आनंदी आहेत. मी योग्य वेळ पाहून मीडियासमोर येईन. सध्या तरी माझा सर्वांसमोर येण्याचा विचार नाही’ असे रितेश म्हणाला आहे.