नवविवाहित राखी सावंतचा महिनाभरात काडीमोड?

पण लग्नाला एक महिना होताच राखी उदास असल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Mumbai
rakhi sawant
राखी सावंत

ड्रामा क्वीन राखी सावंत तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे सतत चर्चेत असते. महिन्याभरापूर्वीच राखीने रितेश नावाच्या एनआरआय व्यक्तीशी लग्न केले. तो युकेचा स्थायिक असल्याचे तिने स्वतः सांगितले. पण लग्नानंतर तो लगेच यूकेला परतला. दरम्यान काही दिवसांपूर्वी राखीच्या गुपचूप लग्न आणि मधूचंद्राचे फोटो व्हायरल झाले होते. पण लग्नाला एक महिना होताच राखी उदास असल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. सोशल मीडियात हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून, या व्हिडिओमुळे राखीचा काडीमोड झाला की काय? अशा चर्चा तिच्या चाहत्यांमध्ये रंगल्या आहेत.

सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एरव्ही बिनधास्त दिसणारी राखी उदास दिसत आहे. या व्हिडिओत राखी चक्क रडताना दिसत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पाहून तिचे चाहते सुद्धा हैराण झाले आहेत. चाहत्यांनी तिच्या उदास होण्यामागचे कारण विचारले आहे.

२९ जुलै २०१९ रोजी मुंबईच्या जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये राखीने एनआरआय रितेश सोबत गुपचूप लग्न केले होते. या लग्नाला केवळ ४ ते ५ जणच उपस्थित होते. विशेष म्हणजे कोणत्याही हॉलमध्ये लग्न न करता हॉटेलच्या रुममध्ये हे लग्न पार पडले होते.

लग्नानंतर यूकेला राहणारा तिचा पती रितेश लगेचच यूकेला गेला. लवकरच राखीसुद्धा यूकेला जाणार होती. त्यासाठी तिच्या व्हिसाची प्रक्रियासुद्धा सुरु झाली होती.

हेही वाचा – बर्थडे बॉय आयुष्मान खुराणा एकेकाळी ट्रेनमध्ये गाणे गात असे!