भारत सोडून राखी सावंत जाणार ‘या’ ठिकाणी

आता पतीसोबत युकेमध्ये राहणार राखी सावंत.. सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय व्हायरल

Mumbai
rakhi sawant share honeymoon photo on instagram
बॉलिवूडची अभिनेत्री राखी सावंत

बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणून ओळख असणारी अभिनेत्री नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असते. काही दिवसांपुर्वी आपल्या लग्नाच्या बातमीने राखीने सगळ्यांच हैराण करून सोडले होते. मात्र आता राखीचा अजून व्हिडिओ समोर आला आहे. त्या व्हिडिओमध्ये राखी भारत देश सोडणार असल्याचे स्वतः सांगत असून ती कायमस्वरुपी युके ला स्थाय़िक होणार असल्याचे देखील सांगतेय.

राखी सावंतने नुकताच हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राखी असे सांगते की, ‘माझ्या चाहत्यांनो मी अनेक वर्ष तुमचे मनोरंजन केले. मात्र आता मी माझ्या पतीकडे कायम स्वरूपी युकेला जात आहे. मी भारत सोडून जाताना माझा एक व्हिडिओ व्हायरल करणार नाही का? मी १२ ते १५ वर्ष इंडस्ट्रीमध्ये मनोरंजन करत आले आहे. पण, मी आता जात आहे. तुम्ही मला आशीर्वाद देणार नाही का? माझ येणारं छप्पन छुरी हे गाणं ६ व्या क्रमांकावर आले आहे. ते पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.’

काही दिवसांपुर्वी राखीने एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये तिने सांगितले की,लवकरच ती सलमान खानच्या शो ‘बिग बॉस १३’ मध्ये ओपनिंग सेरेमनीमध्ये सलमान सोबत छप्पन छुरी या गाण्यावर परफॉर्म करणार आहे. त्यामुळे ड्रामा क्वीनच्या एण्ट्रीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.


हेही वाचा- हिमेश रेशमियानंतर ‘या’ अभिनेत्रीला रानू मंडलसोबत करायचंय काम!

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here