घरमनोरंजनCoronavirus: राम गोपाल वर्मा कोरोना पॉझिटिव्ह; नेटकऱ्यांनी केले अभिनंदन!

Coronavirus: राम गोपाल वर्मा कोरोना पॉझिटिव्ह; नेटकऱ्यांनी केले अभिनंदन!

Subscribe

एका जबाबदार व्यक्तीने नियम तोडल्याने प्रशासन राम गोपाल वर्मा यांच्यावर कारवाई करणार का? असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित झाला आहे.

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. लॉकडाऊननंतरही देशात कोरोना झपाट्याने वाढत आहे. सोशल मीडियावर कोरोनाची जनजागृती करताना अनेक बॉलिवूड मंडळी दिसत आहे. गायक कनिका कपूर हिला कोरोनाची लागण झाल्यानंतर आता दिग्दर्शक राम गोपाल वर्माने देखील ट्विट करत स्वतःला कोरोना व्हायरस झाल्याचे सांगितले आहे. राम गोपाल यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहे. याट्विटवर चाहत्यांसह नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट देखील केल्या, यात कोणी चिंता व्यक्त केली तर कोणी चक्क अभिनंदन देखील केले.

- Advertisement -

कोरोना व्हायरसबद्दल कोणीही कोणत्याही प्रकारच्या आफवा सोशल मीडियाद्वारे पसरवू नये, अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा राज्य सरकार आणि पोलिसांना दिला होता. मात्र, तरीही दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी स्वतःला कोरोनाची लागण झाल्याचे ट्विट केले. एका जबाबदार व्यक्तीने नियम तोडल्याने सरकार राम गोपाल वर्मा यांच्यावर कारवाई करणार का? असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित झाला आहे.

राम गोपाल वर्मांवर कारवाई होणार का?

१ एप्रिल रोजी अनेक जण एकमेकांनी एप्रिल फूल करत असतात. त्यामुळे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कोणीही एप्रिल फूल करू नये. जर कोणी तसा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने सांगितले होते. तसेच त्या अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने जनतेला दिला होता. मात्र नामांकित दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्याकडून असे गैरवर्तन झाल्याने सरकार त्यांच्यावर कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

- Advertisement -

हे ट्विट करणं त्यांना चांगलेच महागात पडले आहे. नेहमीच चर्चेत असणारे राम गोपाल यांनी मला कोरोनाची लागण झाली हे खोटं असल्याचे सांगितले. १ एप्रिल होते म्हणून मी एप्रिलफूल केल्याचे त्यांनी सांगितले त्यानंतर नेटकऱ्यांनी राम गोपाल यांना चांगलेच ट्रोल केले.

राम गोपाल वर्मा यांनी कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे ट्विट केल्याने सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर हे एप्रिल फूल असल्याचे वर्मा यांनी सांगितले. त्यामुळे काही नेटकऱ्यांनी उपहासात्मक प्रतिक्रिया करत अभिनंदन करत चांगलेच ट्रोल केले.

नेटकऱ्यांनी केले चांगलेच ट्रोल

 

नेटकऱ्यांनासह चाहत्यांना दुखावल्यानंतर राम गोपाल वर्मा यांनी दुसरे ट्विट केलं. ज्यात तुम्हाला निराश केलं त्याबद्दल माफ करा, माझ्या डॉक्टरने मला एप्रिल फूल केल्याचे लिहले होते. दरम्यान, यानंतर राम गोपाल वर्मा यांनी सारवा सारव करण्याचा प्रयत्न केला. सध्याच्या गंभीर परिस्थितीत थोडी गमंत करण्याचा प्रयत्न केला. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -