बाहुबलीतील भल्लादेवचे ‘या’ अभिनेत्रीसोबत अफेयर?

'बाहुबली' चित्रपटातील खलनायक 'भल्लादेव' म्हणजे राणा दग्गुबती याचे एका बॉविवूडमधील नवोदित अभिनेत्रीसोबत अफेयर असल्याची चर्चा सध्या बी - टाऊनमध्ये रंगली आहे.

Mumbai
rana daggubati and Rakul gossips
राणाचे 'या' अभिनेत्रीसोबत अफेयर?

प्रभास-अनुष्का यांचा स्टार चित्रपट ‘बाहुबली’ने भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये आपला अनोखा रेकॉर्ड करत वेगळीच ओळख निर्माण केली आहे. बाहुबलीच्या दोन्ही भागांना जागतिक स्तरावर पसंती मिळाली. तसेच या चित्रपटाला आता तीन वर्ष उलटली असली तरी त्यातील कलाकारांची प्रसिद्धी अजूनही कमी झालेली नाही. त्याचबरोबर या चित्रपटातील नायकाच्या भूमिकेइतकीच खलनायकाची भूमिकाही तितकीच गाजली असून या चित्रपटातील खलनायक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या चित्रपटातील खलनायक ‘भल्लादेव’ म्हणजे राणा दग्गुबती याचे एका बॉविवूडमधील नवोदित अभिनेत्रीसोबत अफेयर असल्याची चर्चा सध्या बी – टाऊनमध्ये रंगली आहे.

कोण आहे ही अभिनेत्री?

बॉविवूडमधील नवोदित अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून रकुल प्रीत ही आहे. मात्र, तिने राणा हा तिचा चांगला मित्र असल्याचा दावा केला आहे. गेल्या वर्षापासून राणा आणि रकुल प्रीत यांच्या अफेरची चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये रंगत आहे. मात्र, या दोघांनी देखील अफेरला नकार देत आमची चांगली मैत्री असल्याचा दावा केला आहे. याबाबत सोफी चौधरीच्या एका कार्यक्रमात रकुलला राणाबाबत विचारणा केली असता आमचे तसे काही नसल्याचा दावा रकुल हिने केला आहे.

काय म्हणाली रकुल?

रकुल ही अफेरविषयी विचारल्यानंतर तिने पहिली प्रतिक्रिया ‘अरे बापरे, आमच्यात असे काही नाही. आमच्यात खूप चांगली मैत्री आहे. तसेच आम्ही एकमेकांच्या शेजारी राहतो. त्याचप्रमाणे मी चित्रपटसृष्टीत काम करायला सुरुवात केली तेव्हापासून मी त्याला ओळखत असून आमच्यात तसे काही नाही’,अशी प्रतिक्रिया दिली आहे.


हेही वाचा – बापरे! मुख्यमंत्र्यांच्या घराचे दरवाजे आणि खिडक्या ७३ लाखांचे!